फोटो सौजन्य - सोशल मिडीया
13 ऑगगस्ट रोजी कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यू येथे Made by Google इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. माउंटन व्ह्यू येथील Google च्या मुख्यालयात हा इव्हेंट आयोजित केला आहे. Made by Google इव्हेंटमध्ये Google Pixel 9 सीरीज आणि Pixel Watch 3 लाँच होणार आहे. याबाबत कंपनीने घोषणा केली आहे. तसेच Made by Google इव्हेंटबद्दल कंपनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून माहिती दिली आहे. या इव्हेंटवेळी Google ची नवीन ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 15 देखील लाँच केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांनाच या इव्हेंटबद्दल फार उत्सुकता आहे.
दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात Made by Google इव्हेंटचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी 2 महिने आधीच कंपनीने हा इव्हेंट आयोजित केला आहे. वेळे आधीच इव्हेंट आयोजित करण्याचे कारण कंपनीने अद्याप स्पष्ट केले नाही. यापूर्वी Made by Google इव्हेंटचे आयोजन न्यूयॉर्कमध्ये केले जात होते. मात्र आता कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यू येथील कंपनीच्या मुख्यालयात Made by Google इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीने इव्हेंटची वेळ आणि ठिकाण का बदललं, याबाबत आचा चर्चा सुरु आहेत.
या इव्हेंटबद्दल कंपनीने त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून माहिती दिली आहे. X वर Google ने एक 15 सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये 2 स्मार्टफोन दाखवण्यात आले आहेत. हे दोन्ही फोन वेगवेगळ्या आकाराचे आहेत. यातील एक फोन Pixel 9 आणि Pixel 9 Pro असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कंपनी लवकरच Pixel Fold चे पुढील व्हर्जन देखील लाँच करणार असल्याच्या चर्चा आहेत.
Pixel 9 Pro XL मध्ये 16GB रॅम वापरली जाऊ शकते. यामध्ये Tensor G4 SoC चिपसेट देखील उपलब्ध असेल. Pixel 9 मध्ये 6.03-इंचाचा डिस्प्ले असू शकतो आणि Pixel 9 Pro मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले असू शकतो. तर Pixel 9 Pro XL मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. कंपनी ऑगस्टमध्ये Pixel Watch 3 आणि Pixel Watch 3 XL देखील लाँच करणार असल्याचे सांगितले जात आहे. Pixel Watch 3 ला 1.2-इंच स्क्रीन दिली जाऊ शकते. Pixel Watch 3 XL मध्ये 1.45-इंच स्क्रीन असू शकते.