300 हून अधिक अॅप्सवर Google Play Store चा हातोडा! डेटा आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरल्याचा मोठा आरोप, नेमकं काय आहे प्रकरण? 300 हून अधिक अॅप्सवर Google Play Store चा हातोडा! डेटा आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरल्याचा मोठा आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
गुगल प्ले स्टोअरवरून 300 हून अधिक अॅप्स हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अॅप्समुळे अँड्रॉईड युजर्सचा डेटा आणि क्रेडिट कार्डची माहिती धोक्यात होती, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे युजर्सच्या सुरक्षेसाठी 300 हून अधिक अॅप्स हटविण्याचा निर्णय गुगल प्ले स्टोअरने घेतला आहे. खरं तर गुगल प्ले स्टोअरवर करोडो अॅप्स उपलब्ध आहेत. मात्र यातील काही अॅप्स युजर्सची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी डेव्हलप करण्यात आले आहेत. अशाच काही अॅप्सवर आता गुगल प्ले स्टोअरने कारवाई केली आहे.
असं सांगितलं जात आहे की, गुगल प्ले स्टोअरवरून हटविण्यात आलेले 300 हून अधिक अॅप्स अँड्रॉईड 13 च्या सिक्योरिटी फीचर्सला बायपास करून युजर्सचा डेटा चोरी करत होते. हे अॅप्स 6 करोडहून अधिक लोकांनी इंस्टॉल केले होते. या अॅप्सवर संशय व्यक्त करत त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर गुगल प्ले स्टोअरने या अॅप्सवर कारवाई करण्याचा निर्णय घतेला आहे. अँड्रॉईड युजर्सच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं गुगल प्ले स्टोअरने म्हटलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुगल प्ले स्टोअरने सांगितलं आहे की, या थर्ड पार्टी अॅप्समध्ये, काही अॅप्स असे आहेत जे इन्स्टॉल केल्यानंतर डेटा चोरीचा आणि वैयक्तिक माहिती चोरीचा धोका निर्माण करतात. प्ले स्टोअरवरून असे 300 हून अधिक अॅप्स काढून टाकण्यात आले आहेत. एका अहवालानुसार, IAS Threat Lab ने गेल्या वर्षी शोधून काढले की प्ले स्टोअरवर असे 180 अॅप्स आहेत ज्यांनी 20 कोटी बनावट जाहिरात विनंत्या पाठवल्या आहेत. नंतर तपासात असे आढळून आले की या अॅप्सची संख्या 331 होती.
गुगल प्ले स्टोअरवरून हटविण्यात आलेले हे अॅप्स जाहिराती दाखवून लोकांना त्यांची वैयक्तिक माहिती शेअर करण्यास प्रोत्साहित करायचे. ते फिशिंग हल्ल्यांद्वारे वापरकर्त्यांची क्रेडिट कार्ड माहिती चोरण्याचा प्रयत्न करत होते. हे अॅप्स व्हेपर नावाच्या ऑपरेशन अंतर्गत चालवले जात होते. आता अखेर या अॅप्सवर कारवाई करण्यात आली आहे.
हे अॅप्स फोनमध्ये स्वतःला लपवू शकत होते. तसेच अशी देखील काही प्रकरण समोर आली आहेत, ज्यामध्ये हे अॅप्स त्यांची नाव बदलण्यासाठी देखील सक्षम होते. त्यामुळे युजर्सना अॅप्स असे अॅप्स डिलीट करताना युजर्सचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडायचा. हे अॅप्स युजर्सच्या इंटरेक्शनशिवाय देखील लाँच केले जायचे आणि बॅकग्राउंडमध्ये सुरु राहायचे. यापैकी काहींमध्ये पूर्ण-स्क्रीन जाहिराती दिसत होत्या आणि त्या अँड्रॉइडचे बॅक बटण किंवा जेश्चर अक्षम करण्यास देखील सक्षम होत्या. हे ट्रॅकिंग अॅप्स, हेल्थ अॅप्स, वॉलपेपर आणि क्यूआर स्कॅनर सारख्या उपयुक्ततांसह प्ले स्टोअरवर सूचीबद्ध केले गेले होते. गुगलने म्हटले आहे की, अहवाल मिळाल्यानंतर त्यांनी हे सर्व अॅप्स गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत.