Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google सर्चचे ‘हे’ फीचर्स तुमचा अनुभव बनवतील अधिक मजेदार! आत्ताच ट्राय करा

आपण आपल्याला सोयीस्कर असणाऱ्या भाषेत Google वर माहिती शोधू शकतो. पण Google वर कोणत्याही गोष्टीविषयी माहिती शोधण्यासाठी त्यासंबंधित स्पेलिंग टाईप करण्यासाठी तुम्हाला देखील कंटाळा येतो का? पण Google चे असे काही फीचर्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्पेलिंग टाईप न करता देखील तुम्हाला पाहिजे असणाऱ्या गोष्टींविषयी सर्च करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 25, 2024 | 01:27 PM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us
Close
Follow Us:

जगभरात Google चे लाखो युजर्स आहेत. Google च्या वापराशिवाय आपला एकही दिवस जाणं कठिण आहे. रोज आपण कोणत्यातरी कारणासाठी Google चा वापर करतोच. Google चा वापर करून आपण जगातील कोणत्याही गोष्टीविषयी माहिती मिळवू शकतो. Google वर आपण वेगवेगळ्या प्रकाराचे फोटो सर्च करू शकतो. एखाद्या फोनविषयी Google वरून माहिती मिळवू शकतो. एवढेच नाही तर आपल्या शहरातील हवामान कसं राहणार आहे, याची देखील Google आपल्याला माहिती देतो.

हेदेखील वाचा- Google Map च्या भारतातील नियमात बदल! आता डॉलर नाही तर भारतीय चलनात द्यावे लागणार पैसे

आपण आपल्याला सोयीस्कर असणाऱ्या भाषेत Google वर माहिती शोधू शकतो. पण Google वर कोणत्याही गोष्टीविषयी माहिती शोधण्यासाठी त्यासंबंधित स्पेलिंग टाईप करण्यासाठी तुम्हाला देखील कंटाळा येतो का? पण Google चे असे काही फीचर्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्पेलिंग टाईप न करता देखील तुम्हाला पाहिजे असणाऱ्या गोष्टींविषयी सर्च करू शकता. हँडराईटिंग इनपूट, सर्कल टू सर्च, वॉयस सर्च, एडवांस सर्च आणि Google लेंस हे Google चे काही भन्नाट फीचर्स आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही स्पेलिंग टाईप न करता तुम्हाला पाहिजे असेलल्या गोष्टिंविषयी माहिती शोधू शकता.

हँडराईटिंग इनपूट

सहसा आपण सर्च बारमध्ये आपल्या सर्च करायच्या असलेल्या गोष्टींविषयी टाईप करतो आणि त्यानंतर सर्च करतो. पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही Google वर हँडराईटिंगच्या मदतीने देखील कोणत्याही गोष्टीविषयी माहिती शोधू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये काही सेटिंग करावी लागेल. सर्वात आधी Google.com वर जा. यानंतर सर्च सेटिंग एक्सेस करून हँडराईट ऑप्शनला टॉगल करा. यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रिनवर लिहू शकाल. तुमच्या स्क्रीनवरील ही हँडराईटिंग सर्च बॉक्समध्ये टाईप टेक्स्टच्या स्वरूपात दिसेल.

हेदेखील वाचा- Google ची मोठी घोषणा! लाखो जणांनी डाऊनलोड केलेले हे अ‍ॅप्स आता Play Store वरून हटवणार

सर्कल टू सर्च

सॅमसंग गॅलेक्सी एस सीरीज आणि गूगल पिक्सेल या फोनच्या लाँचिंगनंतर सर्कल टू सर्च ह्या फीचरची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. सर्कल टू सर्च एक टूल आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही एखाद्या इमेजवरील नेमक्या गोष्टीला सर्कल करून त्या गोष्टीविषयी माहिती शोधू शकतात. सर्कल टू सर्च फीचरच्या मदतीने ऑनलाईन शॉपिंग देखील अगदी सोप्पी होते. सर्कल टू सर्च टूलचा वापर करण्यासाठी होम बटन किंवा नेविगेशन बारवर काही काळासाठी क्लिक करून ठेवा. आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवर कोणत्याही टेक्स्ट, इमेज किंवा वीडियोला सर्कल करू शकाल. तुम्ही ज्या गोष्टीला सर्कल केला आहे, Google त्यासंबंधित सर्च रिझल्ट तुम्हाला दाखवेल.

वॉयस सर्च

Google सर्च वापरण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी तुम्हाला गुगलच्या व्हॉईस सर्चद्वारे बोलून तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. यूजर्स ना फक्त ‘Hey Google’ बोलून वॉयस सर्च फीचर सुरु करायचं आहे. यानंतर तुमचा प्रश्न सांगा आणि व्हॉइस असिस्टंट तुम्हाला आवश्यक परिणाम दाखवेल.

Google लेंस

Google लेंस हे देखील एक प्रगत टूल आहे ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही इमेजची माहिती मिळवू शकता. हे AI फीचर आहे, जे तुमच्या कॅमेरा किंवा गॅलरीमधील फोटोंचे विश्लेषण करते आणि योग्य आणि अचूक परिणाम देते. हे स्टँडअलोन ॲप म्हणून तसेच Google सर्च बारमधील माइक आयकॉनच्या पुढे उपलब्ध आहे.

ॲडव्हान्स सर्च

जर तुम्ही ॲडव्हान्स सर्च शोधत असाल तर google ने तुम्हाला याचाही पर्याय दिला आहे. यासाठी तुम्ही google ची ॲडव्हान्स सर्च सुविधा वापरू शकता. यासाठी google.com/advanced_search ला भेट द्या. यामध्ये तुम्हाला विविध फिल्टर्स आणि फीड ऑपरेटर्सचा पर्याय मिळतो.

 

 

Web Title: Google searchs these features make your experience more fun try it now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 01:27 PM

Topics:  

  • Google Search

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.