महिला सुरक्षेसाठी सरकारने लाँच केलं SHe-Box Portal; आता ऑनलाईन तक्रार करू शकणार (फोटो सौजन्य - istockphoto)
आपल्या देशात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये लहान मुली, डॉक्टर्स, विद्यार्थी अशा सर्वांना टार्गेट करण्यात आलं होतं. महिलांवरील अत्याचाराच्या या घटनानंतर देशात आंदोलन करण्यात आलं होती. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी याची मागणी देखील करण्यात आली.
हेदेखील वाचा- Jio AI Doctors: 24 तास राहणार तुमच्यासोबत, आता डिजीटल पध्दतीने सेव्ह करा हेल्थ रेकॉर्ड
या घटनांसोबतच ऑफीस, कार्यालय या ठिकाणी देखील महिलांचा छळ होतो. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाच्या घटनांची तक्रार करताना महिलांना काहीशी भिती असते. या सर्व घटना लक्षात घेत आता सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे. सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी SHe-Box Portal लाँच केलं आहे. यामुळे महिला ऑनलाईन तक्रार करण्यासाठी देखील सक्षम असतील. या तक्रारीच्या आधारे आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी पावलं उचलली जातील. या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिडीतेची संपूर्ण माहिती गोपनियच राहील.
महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि संपूर्ण भारतातील महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी SHe-Box पोर्टल लाँच केलं आहे. अशा बाबींच्या तक्रारी या पोर्टलद्वारे ऑनलाइन केल्या जाऊ शकतात. हे पोर्टल सुरू करण्यामागील सरकारचा उद्देश सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील अत्याचाराच्या तक्रारींवर अहवाल देण्याची प्रक्रिया सुरू करणे आणि तात्काळ कारवाई करणे हा आहे. सरकारी आणि खासगी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाच्या तक्रारी या पोर्टलवर करता येतील. या तक्रारीवर तात्काळ कारवाई केली जाते.
हेदेखील वाचा- जाणून घ्या टेलिग्रामचे काही खास फीचर्स! अडचणीत असलेल्या टेलिग्रामला युजर्सची पसंती कायम
सर्वप्रथम https://shebox.nic.in/user/user_login वर जा.
Register Complaint- Register Your Complaint हा पर्याय मुख्यपृष्ठावर लाल रंगात उपलब्ध असेल. यावर टॅप केल्यानंतर तुम्ही तक्रार रजिस्टर पेजवर पोहोचाल.
तक्रार नोंदणी पृष्ठावरील प्रक्रिया सुरू करण्यासाठी “रजिस्टर तक्रार” वर टॅप करा.
येथे दोन पर्याय असतील – केंद्र सरकारचे कार्यालय आणि राज्य सरकारचे कार्यालय, तुम्हाला केंद्र सरकारच्या कार्यालयावर टॅप करावे लागेल.
वैयक्तिक तपशील- आता तुम्हाला वैयक्तिक तपशील भरण्याचा पर्याय मिळेल.
यामध्ये नाव, संपर्क तपशील आणि रोजगार स्थिती, घटनेचे तपशील आणि पुरावे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
Review and Submit- या सर्व गोष्टी भरल्या की Review आणि Submit चा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा.
गोपनीयता
पोर्टल हे सुनिश्चित करते की तुमची तक्रार पूर्णपणे गोपनीय राहील.
मार्गदर्शन आणि समर्थन
पोर्टल तुम्हाला तक्रार प्रक्रियेत मदत करण्यासाठी मार्गदर्शक प्रदान करते.
उद्देश
SHe-Box पोर्टल लैंगिक छळाच्या तक्रारी हाताळणाऱ्या अंतर्गत समित्या (ICs) आणि स्थानिक समित्या (LCs) बद्दल माहिती गोळा करण्यासाठी केंद्रीय केंद्र म्हणून काम करते.
प्रवेशयोग्यता
पोर्टल सर्व महिलांसाठी प्रवेशयोग्य आहे, मग ते सध्या नोकरी करत असले किंवा नसले तरीही.
कार्यक्षमता
पोर्टल हे सुनिश्चित करते की तक्रारींवर त्वरित प्रक्रिया केली जाते आणि दोषींना शिक्षा केली जाते. पोर्टल त्वरीत संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती देते.