Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Happy Birthday Google! एक चूक आणि मिळालं नाव, जाणून घ्या Google चा 26 वर्षांचा प्रवास

Google लोकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत होते, त्याचे शोध परिणाम त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूपच अचूक होते. त्यामुळे त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढत गेली. Google अधिकृतपणे 4 सप्टेंबर 1998 रोजी शोध इंजिन म्हणून लाँच करण्यात आले Google ने जीमेल, गुगल मॅप्स, गुगल डॉक्स आणि यूट्यूब सारख्या अनेक सेवा सुरू केल्या. पेज आणि ब्रिनच्या सर्च इंजिनला फक्त एका टायपोमुळे गुगल हे नाव मिळाले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 27, 2024 | 01:05 AM
Happy Birthday Google! एक चूक आणि मिळालं नाव, जाणून घ्या Google चा 26 वर्षांचा प्रवास

Happy Birthday Google! एक चूक आणि मिळालं नाव, जाणून घ्या Google चा 26 वर्षांचा प्रवास

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हाला जर विचारलं की इंटरनेटच्या जगातील सर्वात मोठं नाव कोणतं? तर तुमच्या समोर एकचं चित्र उभं राहिल ते म्हणजे Google. Google आपल्या रोजच्या जगण्याचा एक भाग आहे. Google च्या वापराशिवाय आपला एकही दिवस जाणं कठीण आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण आपल्या कामांसाठी Google चा वापर करतो. दिवसातून कितीवेळा तुम्ही Google चा वापर करता, याचे उत्तर तुमच्याकडे आहे का? निश्चितच याचं उत्तर मिळणं कठीण आहे. कारण आपण आपल्या प्रत्येक कामासाठी Google चा वापर करत आहोत.

हेदेखील वाचा- 90 टक्के लोकांना माहित नाही Google आणि Chrome मधील फरक! दोन्ही समान की वेगळे, जाणून घ्या उत्तर

आपल्याला रोज मदत करणारा Google आज 27 सप्टेंबर रोजी 26 वर्षांचा झाला आहे. Google आज आपला 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. यासाठी एक खास डूडल देखील तयार करण्यात आलं आहे. खरं तर 4 सप्टेंबर 1998 रोजी एका कार्यक्रमात अधिकृतपणे सर्च इंजिन म्हणून Google लाँच करण्यात आले होते. मात्र 27 सप्टेंबर रोजी गूगल सर्च इंजिनवर रेकॉर्ड नंबर्स पेज सर्च करण्यात आले होते, त्यामुळे 27 सप्टेंबरला Google आपला वाढदिवस साजरा करतो. आज जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन म्हणून Google ची ओळख आहे. Google 100 हून अधिक भाषांमध्ये वापरलं जात. (फोटो सौजन्य – pinterest)

वाचा Google चा इतिहास

1990 च्या दशकात स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी Google नावाचा शोध लावला आणि इंटरनेट सर्फिंगचे जग पूर्णपणे बदलून टाकले. लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन यांनी Google लाँच करून एक मोठी क्रांती केली असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात, सर्वकाही Google वर आसपास आहे. म्हणजेच, सामान्य माणसाच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कदाचित गुगलकडे आहे. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल की ज्या लोकांनी Google ला जन्म दिला त्यांना Google नाही तर दुसरे काहीतरी नाव ठेवायचे होते. त्याच्या छोट्याशा चुकीने टायपिंग मिस्टेक झाली आणि आपल्या लाडक्या सर्च इंजिनला Google हे नाव मिळालं.

हेदेखील वाचा- 1 सप्टेंबरपासून बंद होणार ‘हे’ ॲप्स; Google ने उचललं मोठं पाऊल, स्पॅमची समस्या होणार कमी

एक चूक आणि बदललं इंटरनेट सर्फिंग

जेव्हा लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन शोध इंजिन विकसित करत होते, तेव्हा त्यांच्या मनात होते की ते त्याला एक नाव देतील जे वेब जगतातील मोठ्या डेटाचे प्रतिनिधित्व करेल. बराच विचार केल्यानंतर दोघांनी एकमताने Googol हे नाव ठरवलं. Googol म्हणजे ‘1’ त्यानंतर 100 शून्य. वैज्ञानिक भाषेत याला ‘टेन टू द पॉवर हंड्रेड’ असेही म्हणता येईल. Googol हे नाव देण्यामागे पेज आणि ब्रिन यांचा एकच हेतू होता की हा शब्द त्यांच्या कल्पनेला बळ देत होता ज्यात त्यांनी वेब जगात उपलब्ध असलेली सर्व माहिती एकाच ठिकाणी देण्याचे स्वप्न पाहिले होते.

या चुकीमुळे नवीन नाव मिळाले

वेब जगतातील कोणत्याही वेबसाइटची नोंदणी करण्यासाठी, एक नाव द्यावे लागते, ज्याला डोमेन म्हणतात. जेव्हा लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन त्यांच्या शोध इंजिनचे डोमेन नोंदणी करत होते, तेव्हा त्यांनी ‘googol.com’ च्या ऐवजी ‘google.com’ अशी नोंदणी केली. यानंतर दोघांनी google नावासोबतच पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही छोटीशी चूक भविष्यात बहुराष्ट्रीय टेक जायंट कंपनी म्हणून ओळखली जाईल आणि जगातील सर्वात मान्यताप्राप्त ब्रँड बनेल याची त्यांना त्यावेळी फारशी कल्पना नव्हती.

Google चे CEO

सुंदर पिचाई सध्या गुगलचे सीईओ आहेत. सुंदर पिचाई हे भारतीय वंशाचे नागरिक आहेत ते 2004 मध्ये गुगलमध्ये रुजू झाले होते. 2014 मध्ये त्यांना Google चे CEO म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. जर आपण सुंदर पिचाई यांच्या पगाराबद्दल बोललो तर त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 1720 कोटी रुपये आहे.

Web Title: Happy birthday google google is celebrating his 26th birthday know the history of google

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 01:05 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.