1 सप्टेंबरपासून बंद होणार 'हे' ॲप्स; Google ने उचललं मोठं पाऊल (फोटो सौजन्य - pinterest)
जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन मानल्या जाणाऱ्या Google ने आता एक मोठं पाऊल उचललं आहे. Google ने आपल्या पॉलिसीमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या पॉलिसीअंतर्गत Google Play Store वरील लो क्वालिटी ॲप्स हटवले जाणार आहेत. ही नवीन पॉलिसी 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. याचा अर्थ 1 सप्टेंबरपासून Google Play Store वरील लो क्वालिटी ॲप्स हटवले जाणार आहेत. यामध्ये हजारो अशा ॲप्सचा समावेश आहे, जे शेकडो लोकांनी डाऊनलोड केले आहेत. पण त्यांना स्पॅमच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. युजर्सच्या या समस्यांचा विचार करता कंपनीने आता हजारो लो क्वालिटी ॲप्स Google Play Store वरून हटविण्याचा निर्णय घेतला आहे.
हेदेखील वाचा- Google Photos च्या नव्या फीचरची चाचणी सुरु; आता ब्लॉक करू शकाल एक्सचा चेहरा, पुन्हा कधीही दिसणार नाही जुन्या आठवणी
देशातील लोक स्पॅमच्या समस्येमुळे खूप त्रस्त आहेत. हे लक्षात घेऊन Google ने आतापर्यंत अनेक मोठी पाऊलं उचलली आहेत. Google च्या निर्णयांमुळे प्रत्येक वेळी युजर्सना चांगला अनुभव मिळाला आहे. आता देखील Google च्या पॉलिसीमध्ये बदल झाल्यानंतर युजर्सना चांगला अनुभव मिळणार आहे. पॉलिसीमधील बदलाचा परिणाम Google Play Store वर दिसणार आहे.
Google ने हा निर्णय गुणवत्ता नियंत्रण लक्षात घेऊन घेतला आहे. हे सुरक्षा आणि गोपनीयतेशी देखील संबंधित आहे. असे मानले जाते की कमी बिल्ड गुणवत्ता आणि खराब डिझाइन केलेले ममालवेअरचे स्रोत असू शकतात. ते वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरण्याचेही काम करतात. त्यामुळेच Google ने आता असे ॲप्स Google Play Store वरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
हेदेखील वाचा- भारतासह इतर 6 देशांमध्ये लाँच होतोय Google AI Overview! फीचर्स अपडेटनंतर कंपनीचा निर्णय
सध्या Google Play Store वर असे हजारो ॲप्स आहेत ज्यांची रचना आणि गुणवत्ता खूपच खराब आहे. परंतु ते वापरकर्त्यांना प्रीमियम सेवा देते. पण बदल्यात, हे ॲप्स वापरकर्त्यांकडून त्यांचे संपर्क, फोटो आणि जीमेलमध्ये प्रवेश घेतात, ज्यामुळे हॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत स्मार्टफोनमध्ये कमी दर्जाचे ॲप असल्यास ते 1 सप्टेंबरपासून काढून टाकले जाऊ शकते. Google च्या या निर्णयाचा परिणाम जगभरातील अँड्रॉईड यूजर्सवर होऊ शकतो. Google च्या मते, मालवेअर आणि थर्ड पार्टी ॲप्स Google Play Store वरून काढून टाकले जात आहेत. ज्यामुळे युजर्सची सुरक्षा टिकून राहिल आणि त्यांना स्कॅमर्स किंवा हॅकिंगचा सामना करावा लागणार नाही.
Google ने यापूर्वी त्यांच्या युजर्ससाठी स्कॅमर्स आणि बनावट ईमेल पासून वाचण्यासाठी अलर्ट जारी केला होता. स्कमॅर्स आणि फिशिंगच्या वाढत्या घटना लक्षात घेता युजर्सनी सावध राहावं, अशा सूचना Google ने दिल्या होत्या. Google च्या थ्रेट ॲनालिसिस ग्रुप (TAG) ने हा अहवाल सादर केला होता. त्यानंतर आता युजर्सची सुरक्षा लक्षात घेत Google ने त्यांच्या पॉलिसीमध्ये बदल करत Google Play Store वरून लो क्वालिटी ॲप्स हटविण्याचा निर्णय घेतला आहे.