आपण आपल्या रोजच्या जीवनात Google आणि Chrome या दोघांचा वापर करतो. मात्र Google चा वापर सर्वाधिक केला जातो. दोन्हींचा वापर वेगवेगळ्या विषयांवरील माहिती मिळवण्यासाठी केला जातो. दोन्हींचा उपयोग तर समान आहे, मग तरीही दोन्ही वेगळे का? अनेक लोकांना असं वाटतं की Google आणि Chrome दोन्ही सारखेच आहेत. पण तस नाही. दोन्हीमध्ये खूप फरक आहे. हा फरक तुम्हाला माहिती आहे का? Google आणि Chrome मधला हाच फरक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
90 टक्के लोकांना माहित नाही Google आणि Chrome मधील फरक! दोन्ही समान की वेगळे, जाणून घ्या उत्तर (फोटो सौजन्य - pinterest)
Google ही मूळ कंपनी आहे जी Google सर्च इंजिन, Google Chrome, Google Play, Google Maps, Gmail अशा सेवा आपल्या युजर्सना देते.
Google हे कंपनीचे नाव आहे. आणि आपण आपल्या स्मार्टफोनवर वापर असलेलं Google एक सर्च इंजिन आहे.
Google सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन असून त्याचा सर्वाधिक वापर केला जातो.
जर Chrome चा विचार केला तर Google Chrome हा Google ने विकसित केलेला Chrome ब्राउझर आहे.
Chrome च्या मदतीने तुम्ही Google च्या इतर सेवांमध्ये प्रवेश करू शकता. Google Chrome जगातील सर्वात लोकप्रिय ब्राउझरपैकी एक आहे
Chrome चे अनेक फायदे असले तरी ते RAM लवकर खाऊन टाकते . यामुळे तुमचा संगणक स्लो होतो. यामुळे अनेक लोकांनी Chrome वापरणे बंद केले आहे.