8200mAh ची मोठी बॅटरी आणि 10.36-इंच डिस्प्ले... बाजारात आलाय HMD चा नवा टॅब्लेट! किंमत केवळ 14,499 रुपयांपासून सुरु
भारतीय टेक बाजारत मंगळवारी HMD T21 हा नवीन टॅब्लेट लाँच करण्यात आला आहे. यामध्ये10.36-इंच 2K रेजोल्यूशन डिस्प्ले आणि आय प्रोटेक्शन सर्टिफिकेशन्स आहे. 8,200mAh बॅटरीसह या नवीन टॅब्लेटमध्ये 18W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. टॅब्लेट octa-core Unisoc T612 चिपसेट आणि 8GB RAM ने सुसज्ज आहे. या नवीन डिव्हाईसमध्ये Ozo Audio टेक्नोलॉजीसह डुअल स्टीरियो स्पीकर्स देण्यात आले आहेत. HMD T21 मध्ये 8-मेगापिक्सेल चा बॅक आणि फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच टॅब्लेट किंमत सर्वांच्या बजेटमध्ये आहे.
HMD चा नवीन T21 टॅब्लेट भारतात 15,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हे डिव्हाईस कंपनीने सिंगल 8GB + 128GB रॅम आणि स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच केले आहे. कंपनीने हा नवीन टॅब्लेट ब्लॅक स्टील कलर ऑप्शनमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. सध्या देशात केवळ ऑफिशियल HMD वेबसाइटद्वारे या नव्या डिव्हाईसची खरेदी केली जाऊ शकते. कंपनीने प्रेस रिलीजमध्ये सांगितलं आहे की, मर्यादित काळासाठी डिव्हाईसच्या खरेदीवर ऑफर्स उपलब्ध आहेत, त्यामुळे ग्राहकांना हा टॅब्लेट कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ऑफर्ससह ग्राहक हा टॅब्लेट HMD वेबसाइटवरून 14,499 रुपयांच्या स्पेशल किंमतीत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)
Get home the complete entertainment pack. From creating to binge watching, HMD T21 is the gadget that makes everyday fun and full of possibilities!
Buy now – https://t.co/CaiBb643bU#HMD #HMDIndia #HMDT21 #SpecialOffer #NewOffer #SpecialPrice pic.twitter.com/vqx9J5qRzk
— HMD India (@HMDdevicesIN) July 15, 2025
HMD T21 टॅब्लेटमध्ये 10.36-इंच 2K रेजोल्यूशन डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये SGS लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन आहे. हे डिव्हाईस octa-core Unisoc T612 प्रोसेसरवर चालते आणि याला 8GB रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. टॅब्लेटमध्ये माइक्रो SD कार्डद्वारे 512GB पर्यंत स्टोरेज वाढवले जाऊ शकते. डिव्हाईस आउट-ऑफ-द-बॉक्स Android 13 वर चालते, मात्र कंपनीने असा दावा केला आहे की, Android 14 अपडेट आधीपासूनच उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी HMD T21 टॅब्लेटमध्ये 8-मेगापिक्सेलचा बॅक आणि फ्रंट सेंसर देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये Ozo Audio टेक्नोलॉजीसह डुअल स्टीरियो स्पीकर सिस्टम आहे. टॅब्लेट Netflix वर HD कंटेंट स्ट्रीम करण्याची सुविधा देते. हे Active Pen ला सपोर्ट करते आणि PC साठी सेकेंड स्क्रीनप्रमाणे वापरले जाऊ शकते.
HMD T21 टॅब्लेटमध्ये 8,200mAh की नॉन-रिमूवेबल बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. टॅब्लेटसोबत बॉक्समध्ये चार्जर देखील उपलब्ध आहे. हे डिव्हाईस डुअल सिम, 4G वॉइस कॉलिंग, SMS, Wi-Fi, GPS, Bluetooth 5.0, OTG, 3.5mm ऑडियो जॅक आणि USB Type-C कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. HMD चं असं म्हणणं आहे की, T21 टॅब्लेट इको-फ्रेंडली मटेरियल्स जसे एल्युमिनियम आणि रिसाइकल्ड प्लास्टिकने तयार केला आहे. यामध्ये IP52 रेटिंग आहे. डिव्हाईसमध्ये सिक्योरिटीसाठी फेस अनलॉक फीचर देण्यात आलं आहे.