Elon Musk कि Mark Zuckerberg? कोणता टेक दिग्गज कमावतो सर्वाधिक पैसे? तंत्रज्ञान क्षेत्रात कोणाचा दबदबा? जाणून घ्या
टेक क्षेत्रातील सर्वात मोठी दोन नावं म्हणजे एलन मस्क आणि मार्क झुकरबर्ग. या दिग्गजांनी टेक क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर ठेवलं आहे. टेक क्षेत्रात सतत येणारे नवीन अपडेट्स आणि प्रगतीमागे इतर दिग्गजांप्रमाणेच एलन मस्क आणि मार्क झुकरबर्गचा देखील हात आहे. दोन्ही टेक दिग्गजांची स्वतंत्र ओळख आहेत. ते त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, एआय आणि इतर कामांसाठी ओळखले जातात. पण या दोघांपैकी कोणता दिग्गज सर्वाधिक कमाई करतो, तुम्हाला माहिती आहे का?
स्पेस टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिक वेहिकल्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंससह तंत्रज्ञान क्षेत्राला पुढे नेण्यासाठी एलन मस्क दिवसरात्र मेहनत करत आहेत. त्यांच्या नव्या तंत्रज्ञानाचे उदारहण आपल्याला सतत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टव्दारे पाहायला मिळते. तर सोशल मीडियाच्या जगात मार्क झुकरबर्गचा दबदबा आहे. त्याने सोशल मीडियाला व्यापलं आहे, असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. तंत्रज्ञान क्षेत्रातील या दोन्ही दिग्गजांनी प्रचंड प्रगती केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
एक इनोवेटर आणि रिस्क घेणारा उद्योगपती अशी टेक दिग्गज एलन मस्कची ओळख आहे. टेस्ला, स्पेसएक्स, न्यूरालिंक, आणि अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित xAI अशा त्यांच्या मालकीच्या टेक कंपन्यांची नाव आहेत. टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ आणि स्पेसएक्सच्या वाढत्या मोहिमांमुळे त्याच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. मस्कची एकूण संपत्ती 230 अरब डॉलरपेक्षा अधिक आहे. मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंपैकी एक आहेत.
मार्क जुकरबर्गने एक कॉलेज प्रोजेक्टने सुरुवात केली होती, यावेळी त्याने फेसबूक सारखे ग्लोबल सोशल नेटवर्क तयार केले होते. पूर्ण जग एकत्र जोडले जाईल, हा त्यामागील उद्देश होता. यानंतर त्याने Instagram आणि WhatsApp लाँच करत मेटा नावाची कंपनी तयार केली. हे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सध्या मेटाच्या मालकीचे आहे आणि मेटा मार्क झुकरबर्गच्या मालकीचे आहे. झुकरबर्गची संपत्ती 150 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचेही म्हटले जाते, परंतु मेटाव्हर्समधील त्याच्या मोठ्या गुंतवणुकी आणि तांत्रिक प्रयोगांमुळे कधीकधी त्याच्या कमाईत चढ-उतार झाले आहेत.
कमाईच्या बाबतीत, एलन मस्क स्पष्टपणे पुढे आहेत, परंतु जेव्हा तंत्रज्ञान क्षेत्राचा विचार केला जातो तेव्हा दोघांचाही त्यांच्या संबंधित क्षेत्रात खूप खोलवर प्रभाव पडतो. मस्क भविष्यातील तंत्रज्ञानाला आकार देत असताना, झुकरबर्ग लोकांच्या डिजिटल दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मस्कचे सेल्फ-ड्रायव्हिंग कार, रॉकेट लाँच आणि ब्रेन-चिप इम्प्लांटसारखे प्रकल्प यासारख्या तंत्रज्ञानामुळे ते एक दूरदर्शी व्यक्ती म्हणून स्थापित होतात तर झुकरबर्गचे लक्ष डिजिटल कम्युनिकेशन्स आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीवर आहे. त्यामुळे कामाबद्दल बोलायचं झालं तर दोघांनी त्यांच्या क्षेत्रात नक्कीच मोठा टप्पा गाठला आहे.