Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Map Update: नियर बाय रेस्टॉरंटपासून ते पेट्रोल पंपापर्यंत, गुगल मॅप कशाप्रकारे शेअर करते महत्त्वाची माहिती

गुगल मॅप्स हे जागतिक पातळीवर सर्वाधिक वापरलं जाणार नेव्हिगेशनसाठी ॲप आहे. परंतु, हे ॲप तुम्हाला फक्त मार्गच सांगत नाही, तर अनेक फीचर्स देखील प्रदान करते. पण गुगलकडे ही सर्व माहिती येते कशी, गुगल मॅपला ही माहिती कोण देते?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 23, 2024 | 11:25 AM
Google Map Update: नियर बाय रेस्टॉरंटपासून ते पेट्रोल पंपापर्यंत, गुगल मॅप कशाप्रकारे शेअर करते महत्त्वाची माहिती

Google Map Update: नियर बाय रेस्टॉरंटपासून ते पेट्रोल पंपापर्यंत, गुगल मॅप कशाप्रकारे शेअर करते महत्त्वाची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

गुगल मॅप तुम्हाला तुमच्या परिसरातील, शहरातील, देशातील, इतकंच नाही तर संपूर्ण जगातील ठिकाणांबद्दल माहिती देते. तुम्ही गुगलला अनेकदा तुमच्या निअरबाय ठिकाणांबद्दल माहिती विचारली असेल. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, गुगलकडे लोकल ठिकाणांची माहिती येते कशी, गुगल आपल्याला ही माहिती कशी शेअर करतो? याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जवळपासची ठिकाणंं एक्सप्लोर करणे, रहदारी तपासणे, रिव्ह्यु तपासणे, एवढेच नाही तर युजर्सना दुकान उघडण्याच्या वेळा, रेस्टॉरंट मेनू इत्यादी सर्व माहिती गुगल मॅप्सवर मिळते. पण आता इथे प्रश्न असा आहे की गुगल मॅपला लोकेशन्स, रेस्टॉरंट आणि इतर आसपासच्या भागांची ही सर्व माहिती कशी मिळते. लोकल गाइड प्रोग्राममुळे हे शक्य झाले आहे. गुगलचा लोकल गाइड प्रोग्राम त्याला सर्व माहिती शेअर करत असतो. ही माहिती गुगल मॅप्स आपल्या युजर्सना शेअर करते. (फोटो सौजन्य – pinterest)

गुगलचा लोकल गाइड प्रोग्राम म्हणजे काय आणि ते कसे काम करते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही गुगलवर लोकल गाइड बनू शकता का, याबद्दल आता आपण जाणून घेऊया. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्यासाठी मजेदार असणार आहेत. कारण ज्या गुगल मॅप्सवरून आपण सर्व ठिकाणांची माहिती घेतो, त्याला ती माहिती कोणामार्फत दिली जाते, हे आता आपल्याला समजणार आहे.

गुगलचा लोकल गाइड प्रोग्राम काय आहे?

गुगलचा लोकल गाइड प्रोग्राम हा गुगलसाठी लोकल डेटा क्राउडसोर्स करण्याचा एक मार्ग आहे ज्यामुळे युजर्सना विशिष्ट स्थानाबद्दल अधिक माहिती आणि डिटेल्स शोधण्यात मदत होते. हा एक ग्रुप आहे जो जगभरातील तुमच्यासारख्या लोकांचा वापर करून तयार केला आहे. जे लोकं गुगल मॅप्सचा वापर करतात, त्यांनी अलीकडे भेट दिलेल्या ठिकाणाबद्दल रिव्ह्यु शेअर करतात आणि माहिती देतात, अशा लोकांसाठी गुगलचा लोकल गाइड प्रोग्राम आहे.

यामध्ये तथ्य-तपासणी, काही संबंधित प्रश्न, फोटो, पुनरावलोकने यासारख्या तपशीलांचा समावेश आहे. गुगल मॅप त्याच्या युजर्सना एखाद्या विशिष्ट लोकेशनबद्दल काहीतरी चुकीचे आढळल्यास लोकेशनची माहिती जोडण्याची आणि एडीट करण्याची देखील अनुमती देते. यासाठी गुगल त्यांना काही पॉइंट्ससह बक्षीस देते.

गुगलचा लोकल गाइड प्रोग्राम कसा कार्य करतो?

त्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. एकदा तुम्ही लोकेशनला भेट दिल्यानंतर, गुगल मॅप्स यूजर्सना प्रथम स्टार रेटिंगच्या स्वरूपात फीडबॅक देण्यास सूचित करेल आणि नंतर डिटेल फॉर्म दिसेल जेथे यूजर्सना अतिरिक्त माहिती प्रदान करण्याचा पर्याय असेल जसे की फोटो, व्हिडिओ, वेळ इत्यादी गुगल त्यांना लोकेशनबद्दल काही प्रश्नही विचारते.

गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

असे केल्याने, युजर्सना काही गुण मिळतात आणि हे गुण त्यांना गुगल मॅप्समध्ये लेवल वाढवण्यास मदत करतील. एकदा विशिष्ट लेवल गाठली की, गुगल युजर्सना एक बॅज आणि डिस्काउंट व्हाउचर, गुगल वैशिष्ट्यांचा एक्सेस यासारखे विशेष पुरस्कार देते.

गुगल मॅप्सवर लोकल गाइड कसे व्हावे

  • जर तुम्हाला गुगल लोकल गाईड प्रोग्राम आवडत असेल, तर तुम्ही लोकल गाइड कसे बनू शकता, याबद्दल जाणून घेऊया.
  • सर्व प्रथम तुमच्या फोनवर गुगल मॅप्स इंस्टॉल करा.
  • आता ॲप उघडा आणि तुमच्या गुगल अकाऊंटने साइन इन करा.
  • योगदान सुरू करण्यासाठी तळाशी असलेल्या बारमधील Contribute चिन्हावर क्लिक करा.
  • ही संपूर्ण आता पूर्ण झाल्यानंतर तुम्ही गुगलच्या लोकल गाइड प्रोग्रामचा भाग आहात.

Web Title: How google map shares every important information like nearby restaurants and petrol pump what is local guide program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 11:25 AM

Topics:  

  • google map new feature

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.