BSNL युजर्सची मजा! मिळणार फास्ट इंटरनेट, फोनमध्ये 4G सिम कसे ऍक्टिव्ह करावे जाणून घ्या
सध्या सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आपल्या 4G सर्विसचा विस्तार करण्यासाठी वेगाने काम करत आहे. BSNL ने आतापर्यंत देशभरातील 37 हजारांहून अधिक साइट्सवर 4G सुरू केले आहे. देशभरात एक लाखाहून अधिक टॉवर्स बसवून युजर्सना 4G शी जोडण्यासाठी कंपनी वेगाने काम करत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या आठवड्यापर्यंत उर्वरित 63 हजार 4G मोबाइल टॉवर लावून देशभरात 4G सर्व्हिस सुरू केली जाईल. म्हणजेच कंपनी आता युजर्सना लवकरच फास्टेस्ट इंटरनेट मिळवून देण्याच्या तयारीत आहे.
जर तुम्हाला BSNL च्या दूरसंचार सेवेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही जवळच्या BSNL कार्यालयातून त्याचे सिम खरेदी करू शकता. यासोबतच बीएसएनएल काही शहरांमध्ये सिमची होम डिलिव्हरीही देत आहे. कंपनीने जुलै महिन्यात आंध्र प्रदेशमध्ये 2 लाखांहून अधिक नवीन कनेक्शन जोडले आहेत. रिलायंस जिओ (Reliance Jio) एयरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आइडिया (VI) ने काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केली आहे, त्यानंतर बरेच लोक BSNL कडे वळत आहेत. जर तुम्हाला BSNS सिम नेटवर्क वापरायचे असेल, तर तुम्ही नवीन सिम घरबसल्या स्वतः ऍक्टिव्ह करू शकता.
हेदेखील वाचा – BSNL च्या 3G सिममध्येही चालेल सुपरफास्ट 4G इंटरनेट, फोनमध्ये लगेच करा या सेटिंग्ज
फोनमध्ये BSNL सिम कसे ऍक्टिव्ह करावे
हेदेखील वाचा – BSNL पडणार सर्वांवर भारी, 5G टॉवर बसवण्याचे काम सुरू, Airtel Jio’ची चिंता वाढली
BSNL’ने आणलाय 4G फिचर फोन
सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने देखील कार्बन मोबाईलच्या भागीदारीत फीचर फोन सादर केला आहे. कंपनी सतत आपले नेटवर्क अपग्रेड करण्याचे काम करत आहे. बीएसएनएलचे ग्राहक बहुतांशी ग्रामीण भागातील आहेत. यामुळेच कंपनीने कार्बन मोबाईलच्या सहकार्याने फीचर फोन आणला आहे. असे केल्याने कंपनीच्या ग्राहकांना 4G सेवेसाठी महागडा स्मार्टफोन खरेदी करण्याची गरज भासणार नाही.