स्मार्टफोनच्या चार्जरची Expiry Date काय आहे? अशाप्रकारे होईल खऱ्या-खोट्याची ओळख
स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. याचा वापर करताना याच्या चार्जरची आपल्याला फार मदत होत असते. चार्जर शिवाय आपण आपला स्मार्टफोन काही कामाचा राहत नाही, ज्यामुळे जितका चांगला स्मार्टफोन तितकाच चांगला त्याचा चार्जर देखील असायला हवा. आजकाल बहुतेक स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनला चार्जर देत नाहीत. फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये हे अधिक दिसून येते. अशा परिस्थितीत नवा स्मार्टफोन घेतल्यावर बाहेरून नवीन चार्जर घ्यावा लागतो. नवीन चार्जरसाठीही खूप पैसे खर्च करावे लागतात.
आपण चार्जर खरेदी करतो पण तो ओरिजनल आहे की डुप्लिकेट आहे हे आपल्याला माहिती नसते. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, एका ट्रिकने तुम्ही तुमचा चार्जर खरा आहे की खोटा, ते सहज ओळखू शकता. स्मार्टफोन हे आजच्या काळात खूप महत्त्वाचे गॅझेट बनले आहे. ऑनलाइन पेमेंट, खरेदी, तिकीट बुकिंग इत्यादी हजारो कामांमध्ये याचा वापर केला जातो. महत्त्वाच्या कामांसोबतच त्याचा मनोरंजनासाठीही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. स्मार्टफोनला दीर्घकाळ चांगले काम करण्यासाठी योग्य चार्जर वापरणे खूप महत्त्वाचे आहे.
फोनची घंटी वाजताच ऐकू येईल कॉलरचे नाव,फक्त ही एक सेटिंग ऑन करा
तुम्ही डुप्लिकेट किंवा कमी दर्जाचे चार्जर वापरल्यास, फोन गरम होणे किंवा फोन ब्लास्टिंग सारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही नुकताच नवीन चार्जर घेतला असेल तर तो ओरिजनल चार्जर (Original charger) आहे की नाही हे तुम्ही शोधू शकता. एवढेच नाही तर तुमच्या फोनच्या चार्जरच्या लाइफविषीयीही माहिती मिळवू शकता. आता ते कसे करायचे, हे आज आम्ही तुम्हला या लेखात स्टेप बाय स्टेप सांगत आहोत.
अशाप्रकारे करू शकता खऱ्या-खोट्याची ओळख