फोनची घंटी वाजताच ऐकू येईल कॉलरचे नाव,फक्त ही एक सेटिंग ऑन करा
तुम्ही गाडी चालवत असाल आणि काही महत्त्वाच्या कामात अडकला असाल किंवा तुम्ही फोनला उत्तर देऊ शकत नसल्याच्या परिस्थितीत असाल तर बऱ्याचदा आपले महत्त्वाचे कॉल्सही मिस होतात. फोन तुमच्यापासून दूर असल्यास, तुम्हाला रिंगटोन ऐकू येते परंतु कोण कॉल करत आहे हे कळत नाही. पण तुमच्या फोननेच तुम्हाला कोण कॉल करत आहे हे सांगितल्यास कसे होईल? खरंतर असे घडू शकते. तुमच्या फोनमध्येच एक फीचर उपलब्ध आहे जे तुम्ही ते चालू करताच तुमचा फोन कॉलरचे नाव सांगू लागतो. आज या लेखात आपण या फिचरविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. फोनमधील हा भन्नाट फिचरला कसे चालू करायचे ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.
कमालीचा आहे हा फिचर
वास्तविक, हे फीचर ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये थर्ड-पार्टी ॲप Truecaller इंस्टॉल करावे लागेल. यामध्ये, तुम्हाला कॉल आल्यावर रिंगटोनऐवजी कॉलरचे नाव सांगण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. फोन तुम्हाला कोण कॉल करत आहे हे सांगेल. स्पॅम फिल्टर व्यतिरिक्त, Truecaller चा सर्वात मोठा फायदा कॉलर आयडी दाखवण्याशी संबंधित आहे. हे ॲप कॉलरचे नाव सांगते ज्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह केलेला नाही.
सेटिंग ऑन करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
तुम्हालाही E-PAN Card डाउनलोड करण्यासाठी ई-मेल आला आहे आहे? मग सावध व्हा,होऊ शकते मोठी फसवणूक
एकदा तुम्ही Truecaller मध्ये नमूद केलेली सेटिंग्ज केल्यानंतर, तुम्हाला कोणाकडूनही कॉल आला की, ॲप तुम्हाला कोण कॉल करत आहे हे सांगेल. जर नंबर सेव्ह केला नसेल तर कॉल आल्यावर त्याचा नंबर जाहीर केला जाईल. याशिवाय तुम्ही गुगल असिस्टंटच्या मदतीने ही सेटिंग ऑन करू शकता. यासाठी, तुम्ही “Ok Google, इनकमिंग कॉलची घोषणा करा” असे बोलून हे सेटिंग चालू करू शकता.