Holil 2025: होळी खेळताना अशी घ्या तुमच्या स्मार्टफोनची काळजी! रंग आणि पाणी दोन्हीपासून ठेवा सुरक्षित
येत्या काहीच दिवसांत होळीचा सण साजरा केला जाणार आहे. होळी म्हटलं की रंग आणि पाणी या दोन्ही गोष्टी आल्याच. होळी खेळताना आपल्याला स्मार्टफोनचा रंग आणि पाणी या दोन्ही गोष्टींपासून बचाव करावा लागतो. कारण या दोन्ही गोष्टी आपल्या स्मार्टफोनसाठी प्रचंड हानिकारक आहेत. रंग आणि पाण्याशिवाय होळीचा सण अपूर्ण वाटतो, पण हेच पाणी तुमच्या स्मार्टफोनसाठी सर्वात मोठा धोका निर्माण करू शकते.
होळी खेळताना तुमचा फोन ओला झाला किंवा रंगला तर तो खराब होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही आधीच काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. आता फोन इतका महत्त्वाचा झाला आहे की एक मिनिट जरी आपला फोन आपल्यासोबत नसेल तर आपण अस्वस्थ होतो. (फोटो सौजन्य – AI Created)
होळीच्या ठिकाणी फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी आपल्याला फोनची गरज असते. पण हेच फोटो आणि व्हिडीओ काढताना किंवा होळी खेळताना आपला स्मार्टफोन खराब होऊ नये, याची काळजी घेणं आवश्यक आहे. होळीच्या दिवशी फोनला रंग आणि पाण्यापासून वाचवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनला पाणी आणि रंगापासून वाचवू शकाल.
होळीच्या वेळी तुमचा फोन सोबत ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ पाऊच वापरा. हे एक प्लास्टिकचे कव्हर आहे, ज्यामध्ये फोनची स्क्रीन सहज दिसते. हे महत्त्वाचे संदेश आणि नोटिफिकेशन्स वाचण्यास मदत करते आणि फोन ओला होण्यापासून किंवा डाग पडण्यापासून देखील वाचवते. हा वॉटरप्रूफ पाउच तुम्ही अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकता.
फोनला पाणी आणि इतर द्रवपदार्थांपासून वाचवण्यासाठी वॉटरप्रूफ केस हा एक चांगला मार्ग आहे. हे फोनवर अगदी व्यवस्थित बसतात आणि कोणत्याही अडचणीशिवाय तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतात. वॉटरप्रूफ केसची किंमत थोडी जास्त आहे.
जर तुम्हाला होळी खेळताना कुठेतरी बाहेर जायचे असेल आणि तुमच्याकडे वॉटरप्रूफ कव्हर किंवा केस नसेल, तर तुमचा फोन प्लास्टिकने व्यवस्थित तुमचा स्मार्टफोन झाकून ठेवा. यामुळे तुमचा स्मार्टफोन ओला होणार नाही. याशिवाय, होळीच्या वेळी फोन शर्टच्या खिशात ठेवू नका. जर कोणी पाणी किंवा रंग फेकला तर ते थेट फोनवर जाऊ शकते, ज्यामुळे नुकसान होण्याचा धोका असतो.
होळीच्या वेळी , फोनला केवळ पाण्यापासूनच नव्हे तर कोरड्या रंगांपासून देखील संरक्षित करावे लागते. कोरडा रंग खूप बारीक आहे आणि फोनच्या चार्जिंग पोर्ट किंवा ऑडिओ जॅकमध्ये जाऊ शकतो. अनेक मोबाईल कव्हरमध्ये पोर्ट आणि जॅक कव्हर देखील असतात. त्यामुळे अशा कव्हरचा वापर करून फोन खराब होण्यापासून वाचवता येतो.