Free Aadhaar Update'साठी फक्त काही दिवस शिल्लक, खर्च टाळायचा असेल तर आजच अपडेट प्रोसेस जाणून घ्या
आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड आपल्या आयुष्याचे एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. आता कोणतेही काम असले किंवा आपली ओळख पटवून द्यायची असली की आपल्याला आपल्या आधार कार्डची गरज भासते. अशात आपला आधार कार्ड अप टू डेट ठेवणे फार गरजेचे आहे. आधार कार्डमध्ये आपला कोणताही तपशील चुकीचा असल्यास मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या आधार कार्डमध्ये काही चूक झाली असेल आणि तुम्हाला ती दुरुस्त करायची असेल, म्हेणजेच तुम्हाला जर तुमचा आधार कार्ड अपडेट करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
तुमच्याकडे आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची उत्तम संधी आहे. मात्र, यासाठी फक्त काही दिवसच शिल्लक आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करायचे असेल तर तुमच्याकडे 14 सप्टेंबरपर्यंत वेळ आहे. जर तुम्ही 14 सप्टेंबरनंतर आधार कार्ड अपडेट केले तर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागतील. UIDAI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मोफत आधार अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 आहे. या तारखेनंतर, युजर्सना 50 रुपये शुल्क भरावे लागेल.
जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुने असेल तर तुम्ही ते लगेच अपडेट करावे. शासनाकडूनही याबाबत सातत्याने आवाहन केले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मोफत आधार अपडेटची वेळ मर्यादा फक्त ऑनलाइन मोडसाठी आहे. तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर गेल्यास तुम्हाला यासाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल. तुम्ही आधार ऑनलाइन कसे अपडेट करू शकता ते आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
हेदेखील वाचा – अनलिमिटेड डेटा कॉलिंगवाला रिचार्ज प्लॅन बंद होणार? टेलिकॉम कंपन्यांनी TRAI’ला काय सांगितले…