Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Map Update: स्पीड चलानपासून सुरक्षित राहण्यासाठी गुगल मॅप करेल मदत, फक्त करा ही सेटिंग

गुगल मॅप तुम्हाला आता स्पीड चलानपासून सुरक्षित राहण्यासाठी मदत करणार आहे. शिवाय तुम्हाला तुमच्या ट्रेनचा लाईव्ह स्टेटस चेक करायचा असेल तर त्यासाठी देखील तुम्ही तुमच्या डिव्हाईसवरील गुगल मॅप्सचा वापर करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 07, 2024 | 10:11 AM
Google Map Update: स्पीड चलानपासून सुरक्षित राहण्यासाठी गुगल मॅप करेल मदत, फक्त करा ही सेटिंग

Google Map Update: स्पीड चलानपासून सुरक्षित राहण्यासाठी गुगल मॅप करेल मदत, फक्त करा ही सेटिंग

Follow Us
Close
Follow Us:

गुगल मॅप्सने नुकतेच एक नवीन फीचर लाँच केले आहे, जे तुम्हाला रिअल टाइममध्ये स्पीड लीमिटबद्दल माहिती देते. हे फीचर स्पीडोमीटर म्हणून ओळखलं जाऊ शकतं. रस्ता सुरक्षेला प्रोत्साहन देणे आणि वेगाला प्रतिबंध करणे, या उद्देशाने गुगल मॅप्सने हे नवीन फीचर लाँच केलं आहे. गुगल मॅप्सचं हे नवीन फीचर स्ट्रीट व्यू आणि थर्ड पार्टी इमेजरी इत्यादींमधून वेग मर्यादा ओळखण्यासाठी AI वापरते. रस्ता सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि चालकांना वेग मर्यादा पाळण्यास मदत करण्यासाठी, गुगल मॅप्सने अलीकडेच हे फीचर जागतिक स्तरावर लाँच केलं आहे.

हेदेखील वाचा- Google Map Update: iPhone वर गुगल मॅपला डिफॉल्ट नेविगेशन अ‍ॅप बनवायचं? या सोप्या टीप्स तुम्हाला करतील मदत

ड्रायव्हर्सना मदत करण्यासाठी आणि ड्रायव्हर्सना उत्तम सुरक्षितता आणि नेव्हिगेशन सहाय्य प्रदान करण्यासाठी, गुगल मॅप्सने स्पीडोमीटर फीचर विकसित केले आहे, जे जगभरातील रस्त्यांसाठी रिअल-टाइम स्पीड लीमिट माहिती दर्शवते. तुम्ही ही सुविधा कशी वापरू शकता याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)

गुगल मॅप्समध्ये स्पीडोमीटर कसे इनेबल करावे

  • सर्वात आधी तुमच्या Android डिव्हाइसवर गुगल मॅप ॲप ओपन करा.
  • आता गुगल मॅप्सच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात तुमच्या प्रोफाइल फोटोवर किंवा नावाच्या पहिल्या अक्षरावर क्लिक करून ड्रॉप-डाउन मेनू उघडा.
  • त्यानंतर ड्रॉप-डाउन मेनूमध्ये ‘सेटिंग्ज’ निवडा. आता सेटिंग्ज मेनूमध्ये ‘नेव्हिगेशन सेटिंग्ज’ ऑप्शन सिलेक्ट करा.
  • एकदा तुम्ही नेव्हिगेशन सेटिंग्जमध्ये आल्यावर, ‘ड्रायव्हिंग पर्याय लेबल्स’ सेक्शनमध्ये जा आणि स्पीडोमीटरसाठी टॉगल स्विच चालू करा.
  • एकदा तुम्ही स्पीडोमीटर इनेबल केल्यावर, ते गुगल मॅप नेव्हिगेट करताना तुमचा GPS स्पीडबद्दल माहिती देईल.
  • जर तुम्ही रंग बदलून वेग ओलांडत असाल तर स्पीडोमीटर तुम्हाला अलर्ट देखील करू शकते.
  • त्यामुळे गाडी चालवाताना तुमची वेग मर्यादा ओलांडली जाणार नाही आणि तुमच्या गाडीसाठी स्पीड चलान देखील कापलं जाणार नाही.

गुगल मॅप्सवरून चेक करा ट्रेनचा लाईव्ह स्टेटस

  • ट्रेनचा लाईव्ह स्टेटस तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनवर विविध प्रकारचे ॲप्स इन्स्टॉल करता का? जर होय असेल तर आता असे करण्याची गरज नाही. फोनमध्ये आधीपासूनच असलेल्या गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या ट्रेनचा लाईव्ह स्टेटस चेक करू शकता.
  • ट्रेनचा लाईव्ह स्टेटस चेक करण्यासाठी तुमच्याकडे सक्रिय गुगल अकाऊंट असणे आवश्यक आहे.
  • यासोबतच फोनमध्ये इंटरनेट सुविधा असणे आवश्यक आहे.

हेदेखील वाचा- Google Map Update: आता गुगल मॅप रस्त्याची रुंदीसुध्दा सांगणार, 8 शहरांमध्ये सुरू होतेय नवी सुविधा

  • सर्वात आधी तुम्हाला फोनमध्ये गुगल मॅप्स ओपन करावे लागेल.
  • आता सर्च बारमध्ये डेस्टिनेशन डिटेल्स द्यावे लागतील. (जसे दिल्ली ते मुंबई)
  • आता Direction वर टॅप करा आणि ‘Two-wheeler’ आणि ‘Walk’ दरम्यान असलेल्या ट्रेन आयकॉनवर टॅप करा.
  • आता ट्रेनच्या आयकॉनसह मार्ग निवडावा लागेल.
  • मार्ग निवडल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या ट्रेनच्या नावावर क्लिक करावे लागेल.
  • आता ट्रेनचे लाईव्ह स्टेटस स्क्रीनवर दिसेल.
  • एवढेच नाही तर ट्रेन नियोजित वेळेपासून उशिरा येणार असल्यास फोन स्क्रीनवर याबाबत माहिती पाहता येईल.

Web Title: How to use google map to avoid speed challan and track live status of your train know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 10:11 AM

Topics:  

  • google map new feature

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.