फोन व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी त्याची नीट निगा राखणे आणि त्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. फोनची नीट काळजी घेतली नाही तर तुमचा फोन हळूहळू निकामी होऊ लागतो आणि यात अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळेच फोन वापरण्यासाठीच्या काही महत्त्वपूर्वक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अनेकांची तक्रार असते की फोन जुना झाला की त्याचा वेग कमी होऊ लागतो. तर काही किरकोळ गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही म्हणून असे घडते. तुम्ही ‘कॅशे’ (Cache) हा शब्ध नक्कीच ऐकला असावा पण हे काय आहे आणि फोनसाठी ते कसे हानिकारक आहे हे काही लोकांनाच माहीत असावे. फोनवरून कॅशे कसा साफ केला जाऊ शकतो आणि त्याचा तुमच्या फोनवर कसा वाईट परिणाम होतो ते जाणून घेऊयात.
आपण आपल्या फोनमध्ये इंस्टाल केलेल्या एप्लिकेशन्सची लिस्ट (Applications List) पाहण्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन स्टोरेज मेनू (Menu) वर जाऊन ऍप स्टोरेजवर क्लीक करा. आता तुम्हाला इथे जाऊन तुम्हाला ज्या ऍपसाठीचा कॅशे (Cache) आणि डेटा क्लिअर करायचा असेल तर तुम्ही इथे ते करू शकता. फालतू स्टोरेजला डिलिट करण्यासाठी ‘Clear Cache’ वर क्लिक करा. इथे ‘Clear Storage’ ऑप्शनदेखील आहे. मात्र हा ऑप्शन सावधानगीरीने निवड कारण हे सर्व ॲप डेटा डिलिट करण्याचे काम करते.
[read_also content=”POCO च्या सर्वात स्टायलिश स्मार्टफोनची धमाकेदार एन्ट्री, आता अर्ध्या तासातच फोन फुल चार्ज होईल https://www.navarashtra.com/technology/pocos-most-stylish-smartphones-entry-soon-now-the-phone-will-be-fully-charged-in-half-an-hour-536544.html”]
प्रत्येक ऍपचा कॅशे क्लिअर न केल्यामुळे फोनचा परफॉर्मन्स बिघडू लागतो. कॅशे फाइल्स कालांतराने साठवल्या जातात आणि तुमच्या फोनची स्टोरेज स्पेस आणि सिस्टम भरू शकतात. फोनमध्ये पूर्ण स्टोरेज असल्यामुळे, अनेक समस्या उद्भवतात, जसे की ॲप लोड होण्यास कमी वेळ लागणे, ॲप्स ओपन स्विच होण्यास विलंब लागणे आणि फोनचे काम हळू हळू करण्यास सुरवात होते.
iPhone मध्ये कॅशे कसे क्लियर करावे?






