Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधार कार्ड हरवल्यांनंतर काय करावे? चिंता करू नका, फक्त ‘या’ स्टेप्स फॉलो करा

आजच्या डिजिटल युगात आपले आधार कार्ड आपल्यासाठी एक महत्तवाचे कागदपत्र बनले आहे. सध्या अनेक महत्तवाच्या कामांसाठी आपल्याला आपल्या आधार कार्डची गरज भासते अशात जर आपले आधार कार्ड हरवले तर आपल्या पोटात गोळा येतो. मात्र आता चिंता करू नका आणि आपले आधार कार्ड मिळवण्यासाठी फक्त एक सोपा उपाय करून पहा. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 07, 2024 | 08:58 AM
आधार कार्ड हरवल्यांनंतर काय करा

आधार कार्ड हरवल्यांनंतर काय करा

Follow Us
Close
Follow Us:

आधार कार्ड हे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. आज लहान असो वा मोठे सर्वांकडेच आधार कार्ड असणे काळाची गरज बनली आहे. आपली ओळख पटवण्यापासून तर अनेक डिजिटल कामात आधार कार्डची गरज भासत असते. मग बँकेचे काम असूद्यात किंवा कोणत्या नोकरीवर रुजू व्हायचे असूद्यात प्रत्येक वेळी आपल्याला विचारले जाणारे कागदपत्र म्हणजे आपले आधारकार्ड.

माझे आधार, माझी ओळख हे आधार कार्डचे ब्रीदवाक्य उगाचच ठेवलेले नाही. कोणतेही महत्त्वाचे काम असले की आपल्याला आपल्या आधार कार्डची गरज भासतेच. अशात तर जर कधी आपले आधार कार्ड अचानक हरवले तर मात्र आपली तारांबळ उडाल्याशिवाय राहत नाही. मात्र आता चिंता करण्याची काहीच गरज नाही, आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड हरवल्यास काय करावे यासाठीच्या काही सोप्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

हेदेखील वाचा – Google चे नवीन फिचर सोडेल फोनची लत, लहान मुलांना कंट्रोल करण्यास करेल मदत

आधारकार्ड हरवल्यास या स्टेप फॉलो करा

  • यासाठी सर्वप्रथम आपले गुगल खाते ओपन करा आणि ॲड्रेस बारमध्ये http://www.uidai.gov.in टाईप करा, यानंतर तुमच्या समोर एक युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) चे अधिकृत संकेतस्थळ येई, हे अधिकृत संकेतस्थळ आहे, जिथे तुम्ही तुमच्या आधार कार्डाविषयीची संबंधित सर्व माहिती मिळू शकते
  • आता UIDAI अधिकृत संकेतस्थळाच्या होम पेजवर, ‘Retrieve Lost UID/EID’ हा पर्याय शोधा, हा पर्याय सहसा ‘आधार सेवा’ (Aadhaar Services) विभागात आढळतो, हा पर्याय सापडला की त्यावर क्लिक करा
  • यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, याजागी तुम्ही तुमचे हरवलेले आधार कार्ड पुन्हा मिळवण्यासाठीची प्रक्रिया सुरु करू शकता
  • तुमची ओळख पटविण्यासाठी तुम्हाला काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल जसे की, तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर इ.
  • यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर एंटर कराल त्यावर एक OTP पाठवला जाईल
  • तुम्हाला आधार कार्ड क्रमांक किंवा नावनोंदणी आयडीमध्ये नक्की काय रिट्रिव्ह करायचे आहे त्यावर क्लिक करा
  • जर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक हवा असल्यास, ‘आधार क्रमांक‘ (UID) पर्याय निवडा. जर तुम्हाला नावनोंदणी क्रमांक हवा असल्यास ‘आधार नोंदणी क्रमांक (EID) हा पर्याय निवडा
  • ओटीपी पाठवा या बटणावर क्लिक करा. तुमच्या आधारबरोबर लिंक करण्यात आलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला सहा अंकी ओटीपी पाठविला जाईल. संकेतस्थळावर दिलेल्या फील्डमध्ये हा ओटीपी टाका. OTP बरोबर तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा सिक्योरिटी कोडदेखील टाकावा लागेल. एकदा तुम्ही हा तपशील भरला की, मग ‘सबमिट करा’वर क्लिक करा
  • तुम्ही तपशीलची नीट पडताळणी केल्यांनतर तुम्हाला तुमचा आधार किंवा नोंदणी क्रमांक तुमच्या ईमेल ऍड्रेसवर किंवा मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल
 

 

 

 

Web Title: If you lost your aadhar card then follow these steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 08:58 AM

Topics:  

  • aadhar card

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.