सध्या डिजिटल युग सुरु आहे. या वाढत्या तंत्रज्ञानाचा लहान मुलांना अनेक प्रकारे फायदा होत आहे. मात्र याचा गरजेपेक्षा अधिक वापर अनेक आजरांना आमंत्रण देत आहे. सध्याच्या काळात ऑनलाइन आणि ऑफलाइन जीवनाचा समतोल राखणे हे एक आव्हान बनले आहे. विशेषत: मुलांच्या दृष्टीकोनातून, ते आणखी कठीण आहे. आजकाल मुलं तासन् तास फोनवर आपला वेळ घालवतात.
मुलांच्या याच सवयीमुळे आता पालकांना आपल्या मुलांची विशेष काळजी वाटू लागली आहे. पालकांच्या या समस्या गुगलने स्पष्ट करत, कंपनीने नुकतेच अँड्रॉईड ग्राहकांसाठी एक नवीन फीचर आणले आहे. शाळेच्या वेळेच्या वैशिष्ट्यामध्ये, पालकांना त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवण्याची सोय मिळते. हे वैशिष्ट्य काय आहे आणि पालक कशी मदत करू शकतात? त्याबद्दल सर्व काही आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
जर तुमच्या मुलांना अनेक तासनतास फोन वापरण्याचे व्यसन लागले असेल तर गुगलचे हे फीचर तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. गुगलच्या या फीचरमुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या फोनवर लक्ष ठेवण्यास मदत होते. पालकांना हवे असल्यास, ते हे देखील ठरवू शकतात की फोनवर कोणते ॲप किती वेळ उघडे राहील किंवा मुलाने किती वेळ फोन वापरावा.
गुगलचे स्कूल टाईम फीचर फोनला डेडिकेटेड होम स्क्रीनवर चालविण्यास अनुमती देते. जर हे फीचर चालू असेल तर फोनमध्ये फक्त काही निवडक ॲप्स किंवा फाइल्समध्ये प्रवेश करता येईल. हे फिचर Google Family Link ॲपद्वारे वापरले जाऊ शकते. तुमच्या मुलाने शाळेत शिकत असताना फोन वापरला तर या फीचरच्या मदतीने तो बंद केला जाऊ शकतो. यामध्ये मुलांना फक्त काही कॉन्टॅक्टशी संपर्क साधण्याची परवानगी आहे.
हेदेखील वाचा – Sheikh Hasina च्या विमानाचे लाइव्ह ट्रॅकिंग कसे केले? कोणती टेक्नॉलॉजी वापरण्यात आली? जाणून घ्या