
भारतात लवकरच सुरु होणार 6G (फोटो सौजन्य - istock)
भारत वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताला डिजीटल इंडिया बनवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत. भारताला डिजीटल इंडिया बनवण्यासााठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या खेड्यापाड्यांमधील नेटवर्कची समस्या दूर करणं. ही नेटवर्क समस्या दूर व्हावी आणि भारतातील सर्वजण डिजीटल इंडिया उपक्रमात सहभागी व्हावेत यासाठी मोठ्या कंपन्या प्रयत्न करत आहेत. भारतातील खेड्यापाड्यांमध्ये 4G नेटवर्क सुरु केलं जात आहे. तर भारतातील अनेक शहरांमध्ये 5G नेटवर्क सुरु करण्यात आलं आहे. ज्यामुळे नेटवर्कची समस्या काही प्रमाणात कमी होताना पाहायला मिळत आहे. पण आता लवकरच नेटवर्कची समस्या पूर्णपणे संपू शकते. कारण भारत 6G नेटवर्कवर काम करत आहे.
हेदेखील वाचा- BSNL लाँच करणार 200MP कॅमेरा असलेला 5G स्मार्टफोन? कंपनीने सोशल मिडीयावर केला खुलासा
6G तंत्रज्ञानामुळे लोकांच्या आयुष्यात बरेच बदल होणार आहेत. 6G तंत्रज्ञानामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनात आणि अर्थव्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडतील. 6G संपूर्ण जगासाठी एक महत्त्वपूर्ण विकास असेल. 6G हे पुढील पिढीचे वायरलेस तंत्रज्ञान असेल, जे मोबाइल इंटरनेटला एका नव्या स्तरावर घेऊन जाईल. भारतात, 6G तंत्रज्ञानावर खूप वेगाने काम केलं जात आहे. भारतातील 6G तंत्रज्ञान प्राथमिक टप्प्यात आहे. भारताला 6G तंत्रज्ञानामध्ये जगातील अव्वल देश बनायचं आहे. भारत सरकार आणि भारतातील विविध टेलिकॉम कंपन्या संयुक्तपणे 6G तंत्रज्ञानावर संशोधन आणि विकास करत आहेत.
भारतात 6G तंत्रज्ञानावर काम सुरु असतानाच अमेरिका आणि स्वीडन 6G वायरलेस तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी एकत्र प्रयत्न करत आहेत. अमेरिका आणि स्वीडनमधील ही भागिदारी अनेक प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार आहे. दोन्ही देश 6G तंत्रज्ञानासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत संशोधन संसाधनांवर संयुक्तपणे काम करत आहेत. यामध्ये नवीन रेडिओ फ्रिक्वेन्सी बँड, अँटेना डिझाइन आणि नेटवर्क आर्किटेक्चरचा समावेश असेल. दोन्ही देश 6G साठी आंतरराष्ट्रीय मानकांच्या विकासामध्ये सक्रियपणे सहभागी होतील. एकत्रितपणे, दोन्ही देश हे सुनिश्चित करतील की 6G तंत्रज्ञानाचा जगभरात चांगला वापर केला जाईल आणि लोक मोठ्या प्रमाणात 6G नेटवर्कचा स्वीकार करतील.
हेदेखील वाचा- Amazon, Flipkart की Vijay Sales, कुठे मिळणार धमाकेदार ऑफर्स आणि डिस्काऊंट? जाणून घ्या
दोन्ही देश 6G तंत्रज्ञानासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याच्या तयारीत आहेत. जगातील परिस्थितीत 6G तंत्रज्ञानाची चाचणी करणे आणि त्याची क्षमता प्रदर्शित करणे हे या प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे. दोन्ही देश 6G तंत्रज्ञानाच्या विकासात उद्योगांनाही सहभागी करून घेतील. यामुळे नवीन कंपन्या आणि उत्पादनांचा उदय होण्यास मदत होईल आणि 6G तंत्रज्ञानाच्या व्यापारीकरणाला चालना मिळेल. 6G तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे.
6G नेटवर्कमुळे अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडतील. 6G तंत्रज्ञानामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनात आणि अर्थव्यवस्थेत बरेच बदल होणार आहेत. 6G वायरलेस तंत्रज्ञान केवळ या दोन देशांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक महत्त्वपूर्ण विकास असेल. अमेरिका आणि स्वीडन यांच्यातील सध्याच्या भागीदारीचा भारताच्या 6G तंत्रज्ञानाला काय फायदा होतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.