Infinix Hot 50 5G स्मार्टफोन उद्या भारतात होणार लाँच! डिझाईन पाहून व्हाल थक्क (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
टेक कंपनी Infinix चा नवीन 5G स्मार्टफोन Infinix Hot 50 5G उद्या 5 सप्टेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या फोनची चर्चा सुरु होती. फोनच्या डिटेल्सबद्दल काही माहिती देखील समोर आली होती. यानंतर कंपनीने अधिकृतपणे फोनचे डिटेल्स जाहीर करत लाँचिंग डेटबद्दल सांगितलं. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार उद्या 5 सप्टेंबर रोजी Infinix Hot 50 5G स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहे.
हेदेखील वाचा- Vivo आणि Motorola स्मार्टफोनमध्ये येतेय ग्रीन लाइन; वैतागलेल्या युजर्सची कंपनीकडे तक्रार
Infinix Hot 50 5G फोनचं डिझाईन थक्क करणारं आहे. Infinix Hot 50 5G स्मार्टफोन काळा, निळा आणि हिरवा अशा तीन रंगात लाँच केला जाऊ शकतो. कंपनीने फोनचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. Infinix Hot 50 5G हा सर्वात स्लिम स्मार्टफोन असणार आहे. Infinix Hot 50 5G च्या किंमतीबद्दल फ्लिपकार्टवर माहिती देण्यात आली आहे. Infinix Hot 50 5G स्मार्टफोनचा एक छोटा व्हिडीओ देखील फ्लिपकार्टवर शेअर करण्यात आला आहे.
कंपनीने Infinix Hot 50 5G फोनचे डिझाईन आधीच शेअर केलं आहे. कंपनीने शेअर केलेल्या फोटोनुसार, Infinix Hot 50 5G फोन तीन रंगांमध्ये सादर केला जाऊ शकतो. ज्यामध्ये काळा, निळा आणि हिरवा या रंगाचा समावेश असेल. फोनच्या डाव्या बाजूला सिम स्लॉट दिलेला आहे आणि उजव्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सरसह पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर्स मिळतात. Hot 50 5G ची जाडी 7.8mm असेल.
फोनच्या मागील पॅनलवर एक व्हर्टिकल कॅमेरा आयलँड देण्यात आला आहे, ज्यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसत आहे. कॅमेरा बेटाच्या खाली 5G सह Infinix बॅजिंग आहे आणि समोर एक पंच होल कटआउट आहे.फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा लेन्स देण्यात आले आहेत, परंतु फोन 48MP ड्युअल एआय कॅमेरा सेटअपसह ऑफर केला जाऊ शकतो.
हेदेखील वाचा- अनावश्यक स्पॅम कॉलमुळे 2.75 लाख टेलिफोन कनेक्शन तोडले; ट्रायच्या कठोर नियमांचा परिणाम
फोन IP54 रेटिंगसह ऑफर केला जाईल. फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट वापरला जाऊ शकतो. हा फोन धूळ आणि पाण्याच्या स्प्लॅशपासून संरक्षण करण्यास सक्षम असेल. डिस्प्लेमध्ये ‘वेट टच’ फीचरही उपलब्ध असेल. याचा अर्थ बोटे ओली असली तरीही फोन स्पर्शाला प्रतिसाद देईल. नवीन डिव्हाइस 120Hz रिफ्रेश रेटसह डायनॅमिक बार डिस्प्लेसह येईल.
Infinix Hot 50 5G फोनमध्ये 4GB आणि 8GB चे दोन रॅम पर्याय असू शकतात आणि त्यांच्यासोबत 128GB स्टोरेज उपलब्ध असू शकते. आगामी Infinix HOT 50 5G सेगमेंट-फर्स्ट TUV SUD A स्तर 60-महिन्याच्या वॉरंटीसह येईल. जे 5 वर्षे सतत मजबूत कामगिरी करण्यास मदत करेल.
Infinix Hot 50 5G हा फोन भारतात 10,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत सादर केला जाण्याची शक्यता आहे आणि फोनची विक्री ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. हा 5G स्मार्टफोन असल्याने, तो Infinix Hot 40i पेक्षा महाग मानला जात आहे. कंपनीने Hot 40i चा 8GB + 256GB व्हेरिएंट 9,999 रुपयांच्या किमतीत लाँच केला आहे, जो 4G फोन आहे. त्यामुळे Infinix Hot 50 5G ची किंमत थोडी जास्त असण्याची शक्यता आहे.
बॅटरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर, डिव्हाइसमध्ये 4900mAh बॅटरी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर यामध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टही दिला जाईल.