Vivo आणि Motorola स्मार्टफोनमध्ये येतेय ग्रीन लाइन; वैतागलेल्या युजर्सची कंपनीकडे तक्रार (फोटो सैजन्य - pinterest)
लोकप्रिय ब्रँड OnePlus नंतर आता Vivo आणि Motorola स्मार्टफोन युजर्स ग्रीन लाइनच्या समस्येने हैराण झाले आहेत. Vivo आणि Motorola स्मार्टफोन युजर्सना गेल्या काही दिवसांपासून ग्रीन लाईनच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. Vivo आणि Motorola सोबतच Samsung Galaxy S21 आणि S22 युजर्स देखील स्मार्टफोनवरील ग्रीन लाईन समस्येला तोंड देत आहेत. त्यामुळे ग्रीन लाइनच्या समस्येने वैतागलेले युजर्स कंपनीकडे सतत तक्रार करत असून या समस्येवर उपाय काढावा, अशी मागणी करत आहेत.
हेदेखील वाचा- अनावश्यक स्पॅम कॉलमुळे 2.75 लाख टेलिफोन कनेक्शन तोडले; ट्रायच्या कठोर नियमांचा परिणाम
युजर्सची ही समस्या लक्षात घेता Vivo, Samsung आणि Motorola या तिन्ही कंपन्यांनी एक खास ऑफर आणली आहे. Vivo आणि Motorola चे जे युजर्स ग्रीन लाइनच्या समस्यांना तोंड देत असतील अशा युजर्ससाठी कंपनीने डिस्प्ले वॉरंटी आणि मोफत स्क्रीन अपग्रेडची ऑफर दिली आहे. तर Samsung ने Samsung Galaxy S21 आणि Samsung Galaxy S22 युजर्ससाठी विनामूल्य डिस्प्ले बदलण्याची घोषणा केली आहे.
हेदेखील वाचा- OnePlus च्या या फोनमध्ये निर्माण झाली समस्या; फोनच्या किमतीपेक्षा दुरुस्तीचा खर्च जास्त
कंपनीच्या या निर्णयामुळे युजर्सना काहीसा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. या ग्रीन लाइनच्या समस्येबाबत अनेक युजर्सनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर माहिती दिली आहे. यापूर्वी केवळ OnePlus युजर्सची ग्रीन लाइन संबंधित तक्रार होती. मात्र आता Vivo, Samsung आणि Motorola या तिन्ही युजर्सना त्यांच्या स्मार्टफोनवर ग्रीन लाईन समस्येचा सामना करावा लागत आहे.
After OnePlus and Samsung, Motorola and Vivo users start facing green line issue
Kay aap ke phone me green line issue aa raha hai?
Mere to maje hai kyuki IPS LCD display jinda bad✌️😅 pic.twitter.com/886eJKLom4
— Nagajan Dasa (@NagajanDasaa) September 3, 2024
Hey @Vivo_India my friend got a green line screen issue. After upgrading to 14 everything was fine and nice and the phone was working smoothly but one day after charging the phone it got a line in the middle of the phone. It’s vivo v25 pro.
@@adarshkuma40372 pic.twitter.com/6kscOdBsR7— ayan (@Ayanbright0) September 3, 2024
मोटोरोलाच्या G सिरीजमधील 82 आणि G52 मध्ये युजर्सना ग्रीन लाइनच्या सर्वाधिक समस्येचा सामना करावा लागत आहे. अनेक युजर्सनी सोशल मिडीयावर त्यांच्या फोनचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ग्रीन लाइन समस्या निर्माण झाली आहे. काही प्रकरणांमध्ये स्क्रीनवर एकच हिरवा रंग दिसतो तर काहींमध्ये विविध रंगांच्या अनेक रेषा डिस्प्लेवर दिसत आहेत. त्याचप्रमाणे, Moto G82 युजर्स देखील ग्रीन लाइन समस्येचा सामना करत आहेत.
ग्रीन लाइनच्या समस्येमुळे Vivo युजर्स देखील चिंतेत आहेत. Vivo X80, Vivo X80 Pro आणि Vivo X70 Pro+ स्मार्टफोन युजर्सना ग्रीन लाइन समस्येचा सामना करावा लागत आहे. Vivo X70 Pro+ च्या एका युजर्सने पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्याने सांगितलं आहे की, जुलै 2024 अपडेटनंतर ही समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या हार्डवेअरशी संबंधित असल्याचे दिसत नाही. एका अहवालानुसार, ही ग्रीन लाइन समस्या OLED आणि AMOLED डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनवर परिणाम करते. या समस्येवर स्क्रीन बदलणे हा एकमेव उपाय आहे.