फेसबुक, इंस्टाग्राम की व्हॉट्सॲप... कोणत्या प्लॅटफॉर्मचे आहेत सर्वाधिक युजर्स? (फोटो सौजन्य - pinterest)
सध्या सोशल मिडियाचे जग आहे. जगभरातील लोक एकमेकांना समोरासमोर भेटण्यापेक्षा सोशल मीडियावर भेटणं अधिक पसंत करतात. भेटूण बोलण्यापेक्षा सध्या व्हिडिओ कॉल आणि चॅटिंगद्वारे संवाद साधला जात आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात सोशल मीडियावर युजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्स त्यांचा बराच वेळ घालवतात.
हेदेखील वाचा- TRAI ने करोडो मोबाईल वापरकर्त्यांना दिला मोठा दिलासा, आता ‘या’ दिवसापासून लागू होणार नवीन नियम
WhatsApp चा वापर चॅटिंग, कॉलिंग आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट्स शेअर करण्यासाठी केला जातो. तर इंस्टाग्रामचा वापर रील्स पाहण्यासाठी आणि फेसबुकचा वापर बिझिनेससाठी केला जातो. पण तुम्हाला माहीत आहेत सध्याच्या काळात कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर केला जात आहे? कोणत्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचे सर्वाधिक सक्रिय युजर्स आहेत? 2024 मध्ये सर्वाधिक वापरले जाणारे सोशल प्लॅटफॉर्म फेसबुक आहे. मेटाटच्या मालकिच्या फेसबुकवर 3.07 अब्ज सक्रिय युजर्स आहेत. सोशल मिडीयावर सर्वाधिक युजर्स असणाऱ्या यादीत मेटा प्रतिनिधीत्व करत आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांच्या उपस्थितीची वेळ झपाट्याने वाढत आहे, पूर्वी लोक कमी कालावधीसाठी सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म वापर करत असत, परंतु आता हा वेळ काही तासांपर्यंत पोहोचला आहे. ही चिंतेची बाब आहे. सोशल मिडीयाच्या वाढत्या वापरामुळे लोकांच्या शरिरावर आणि मनावर परिणाम होऊ शकतो. 2024 च्या अखेरपर्यंत, जागतिक लोकसंख्येच्या 66% पेक्षा जास्त लोक इंटरनेट वापरतील, वर्षाच्या अखेरीस एकूण वापरकर्ते 5.35 अब्जांपर्यंत पोहोचतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेदेखील वाचा- Barbie गर्ल्ससाठी Nokia ने लाँच केला Pink Barbie Flip Phone! डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल व्वा!
गेल्या एका वर्षात इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत 1.8% ने वाढ झाली असून 97 दशलक्ष नवीन वापरकर्ते जोडले गेले आहेत. त्याचप्रमाणे सोशल मीडिया वापरकर्त्यांची वाढही झपाट्याने झाली आहे. गेल्या 12 महिन्यांत 5.6% ची वाढ किंवा 266 दशलक्ष नवीन वापरकर्ते जोडले गेले आहेत. एकट्या भारतात सुमारे 821 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आणि 462 दशलक्ष सक्रिय सोशल मीडिया अकाऊंट आहेत, जे इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये 2.6% वाढ दर्शविते.
2024 मध्ये सर्वाधिक वापरले जाणारे सोशल प्लॅटफॉर्म फेसबुक आहे. प्लॅटफॉर्मवर 3.07 अब्ज सक्रिय वापरकर्ते आहेत. डिजिटल क्षेत्रात फेसबुकचे वर्चस्व कायम आहे. YouTube 2.5 अब्ज वापरकर्त्यांसह दुस-या स्थानावर आहे. YouTube लोकप्रिय व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून त्याची लोकप्रियता प्रतिबिंबित करते. मेटाच्या मालकीचे WhatsApp आणि Instagram या दोन्हीकडे 2 अब्ज सक्रिय वापरकर्ते आहेत.
सध्या टेलिग्राम अडचणीत सापडला आहे. मात्र तरी देखील या प्लॅटफॉर्मवर लोकांची उपस्थिती कायम आहे. या यादीत 900 दशलक्ष वापरकर्त्यांसह टेलिग्राम 8 व्या स्थानावर आहे. त्याची लोकप्रियता असूनही, टेलीग्राम सामग्री मॉडरेशनच्या चिंतेमुळे अनेक देशांमध्ये निर्बंधांचा सामना करत आहे.
एकंदरीत पाहिले तर सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या यादीत मेटाचा दबदबा होता. याचे मुख्य कारण म्हणजे मेटाकडे चार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. Meta कडे WhatsApp, Instagram आणि Facebook Messenger सारखे सोशल प्लॅटफॉर्म आहेत.