Instagram Update: इंस्टाग्रामवर सारख्या कंटेटच्या रिल्स पाहून कंटाळलात? आता एका क्लिक करताच होणार रिसेट
सर्वांचं लोकप्रिय सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने एक नवीन अपडेट रोल आऊट केलं आहे. जे युजर्स सेम कंटेटच्या रिल्स पाहून कंटाळले आहेत, त्यांच्यासाठी हे अपडेट फार मजेदार असणार आहे. काही दिवसांपूर्वींच इंस्टाग्रामने ऑटो रिफ्रेश फीचर बंद केलं आहे. त्यामुळे युजर्सच्या फीडवरून आता जुन्या पोस्ट ऑटोमॅटिकली रिफ्रेश केल्या जात नाही. जो पर्यंत युजर्स मॅन्यूअली त्यांची इंस्टाग्राम फीड रिफ्रेश करत नाहीत, तो पर्यंत ते त्यांच्या फीडवर जुन्या पोस्ट पाहू शकतात.
इंस्टाग्रामसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या अपडेटनंतर आता इंस्टाग्रामने एक नवीन फीचर रोल आऊट केलं आहे. रिसेट कंटेट फीचर असं या नवीन अपडेटचं नाव आहे. तुम्ही इंस्टाग्रामवर रिल्स पाहत असाल. एखादी रिल तुम्हाला आवडली तर तुम्ही ती लाईक करता. तसेच तुम्ही काही कंटेट क्रिए़टर्सना फॉलो देखील केलं असेल. (फोटो सौजन्य – pinterest)
तुम्ही ज्या कंटेट क्रिएटर्स फॉलो केलं आहे, किंवा ज्या कंटेटच्या रिल्स लाईक किंवा सर्च केल्या असतील त्या प्रकारच्या रिल्स तुम्हाला सतत पाहायला मिळतात. आपण फीड रिफ्रेश केल्यानंतर देखील त्याच रिल्स आपल्या फीडमध्ये येत राहतात. युजर्सच्या या समस्येवर आता इंस्टाग्रामने एक नवीन उपाय शोधला आहे.
इंस्टाग्रामने युजर्ससाठी रिसेट कंटेट फीचर नावाचं अपडेट रोलआऊट केलं आहे. इंस्टाग्राम रिसेट फीचरवर काम करत आहे. मेटाने स्वतः या फीचरबद्दल सांगितले आहे. इंस्टाग्राममध्ये काय रीसेट करणे आवश्यक आहे? इंस्टाग्राम असे वैशिष्ट्य का आणत आहे? असे अनेक प्रश्न आता तुमच्याकडे असतील. यासाठी तुम्हाला अल्गोरिदम समजून घ्यावा लागेल.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तुम्ही काय सर्च करता, काय बघता, काय ऐकता? हे ॲप्स तुमच्या सर्व आवडी-निवडींची माहिती सेव्ह करते. सुरुवातीला कंपन्या याला नकार देत होत्या, परंतु गेल्या वर्षी इंस्टाग्रामचे ॲडम मोसेरी यांनी हे मान्य केले आणि संपूर्ण प्रक्रियेबद्दल स्पष्टीकरण देखील दिले. इंस्टावरील अल्गोरिदमच्या मदतीने, तुमची प्रोफाइल तयार केली गेली. तुम्हाला कुत्रे किंवा GRWM रील्स आवडतात की नाही हे त्यांनी शोधून काढले. GRWM म्हणजे गेट रेडी विथ मी व्हिडिओ. यानंतर, तुमच्या फीडवर बहुतेक त्याच त्याच रील दिसतात.
तुमची आवड बदलली तरीही ती रीसेट करण्याचा कोणताही पर्याय आतापर्यंत उपलब्ध नव्हता. मात्र आता जर तुमची इच्छा असेल की इंस्टाग्राम तुम्हाला काय दाखवत आहे, त्यांनी दाखवू नये आणि ते काय दाखवत नाहीया सर्व गोेष्टी तुम्ही नवीन फीचरच्या मदतीने रिसेट करू शकता. हा बदल सध्या चाचणीत आहे आणि लवकरच तो प्रत्येकासाठी रोल आऊट केला जाईल. यामुळे युजर्सना त्यांच्या फीडवर नियंत्रण मिळेल.