भारतात सुरू झाली Instagram Creator Lab! क्रिएटर्सना मिळणार फेमस होण्यासाठी खास मंत्र (फोटो सौजन्य - pinterest)
सध्या इंटरनेट आणि सोशल मिडीयाचे जग आहे. इंस्टाग्रामवर रिल्स आणि व्हिडीओ अपलोड करून फेमस होण्यासोबतच पैसे देखील कमावता येतात. इंस्टाग्रामवरील रिल्स म्हणजे पैसे कमवण्याचं एक साधन आहे, असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही. कारण या रिल्स पैसे कमवण्यासोबतच युजर्सना प्रसिध्दी देखील मिळवून देतात. आपण आजपर्यंत असे अनेक रिल्सस्टार किंवा कंटेट क्रिएटर्स पाहिले असतील जे त्यांच्या व्हिडीओमुळे फेमस झाले आहेत. याच कंटेट क्रिएटर्स आदर्श ठेवत अनेक तरूण रिल्स तयार करत पैसे कमवण्यासाठी धडपडत आहेत.
हेदेखील वाचा- UP Digital Media Policy 2024: युट्युबर्स आणि रिल्स तयार करणारे होणार मालामाल! उत्तर प्रदेश सरकार देणार मोठी रक्कम
तुम्ही तुमच्या नोकरीसोबतच रिल्स तयार करून साईड इनकम म्हणून पैसे कमवू शकता. पण यासाठी आपल्याला फॉलोवर्स आणि काही टीप्सची माहिती असणं गरजेचं आहे. ह्या टीप्स तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आणि तुम्हाला एक फेमस कंटेट क्रिएटर बनवण्यासाठी भारतात क्रिएटर लॅब लाँच करण्यात आली आहे. ज्या मंडळींना कंटेट क्रिएटर्सच्या क्षेत्रात त्यांचं करिअर घडवण्याची इच्छा असेल किंवा ज्या कंटेट क्रिएटर्सना या क्षेत्रात अजून प्रगती करायची असेल त्यांच्यासाठी क्रिएटर लॅब लाँच करण्यात आली आहे. कंपनीचा हा निर्णय इंस्टाग्रामवरील सर्वच युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे. क्रिएटर लॅबच्या मदतीने युजर्स नवीन कंटेट तयार करू शकतील.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने एका आयोजित कार्यक्रमात याबाबत माहिती दिली आहे. कंपनीच्या या पाऊलामुळे देशातील लाखो यूजर्सना फायदा होणार आहे. Instagram क्रिएटर लॅब हे कंटेट क्रिएटर्सवर लक्ष केंद्रित करत त्यांना या क्षेत्राबद्दल अधिक माहिती देण्यास सक्षम असेल. एकदा भारतात लाँच झाल्यानंतर, त्यात प्लॅटफॉर्मच्या लोकप्रिय कंटेट क्रिएटर्स समावेश असेल. क्रिएटर लॅबमध्ये, कंपनीने हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा सपोर्ट उपलब्ध करून दिला आहे. जेणेकरून प्रत्येकजण त्यातून शिकू शकेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, क्रिएटर लॅब भारतीय कंटेट क्रिएटर्ससाठी विविध संसाधने ऑफर करेल.
हेदेखील वाचा- युट्यूब क्रिएटर्ससाठी आलं नवीन फीचर! आता चॅनल शेअर करणं होणार अधिक सोपं
आम्ही तुम्हाला सांगतो की Instagram क्रिएटर लॅबमध्ये, देशभरातील 14 कंटेट क्रिएटर्सकडून कंटेट घेतला जाईल. क्रिएटर लॅबमध्ये येणाऱ्या कंटेट क्रिएटर्ससाठी अंतर्दृष्टी आणि धोरणे शेअर केली जातील. संपूर्ण सामग्री हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. मेटा बंगाली, हिंदी, कन्नड, मल्याळम, तेलगू आणि तमिळ भाषांमध्ये सबटाईटल्स देखील देईल.
क्रिएटर लॅबच्या मदतीने, कंटेट क्रिएटर्सना वेगवेगळ्या प्रकारचा कंटेट तयार करण्यात आणि लोकप्रिय कसे व्हायचे हे शिकण्यास मदत केली जाईल. इंस्टाग्राम वेगाने त्याचे प्लॅटफॉर्म अपग्रेड करत आहे. कंपनी सतत नवनवीन फीचर्स आणत आहे. नुकतंच कंपनीने आपल्या करोडो वापरकर्त्यांसाठी तीन रोमांचक वैशिष्ट्ये सादर केली आहेत ज्यात कथांमध्ये कमेंट, वाढदिवसाच्या नोट्स आणि DM मध्ये कटआउट समाविष्ट असतील. आता Instagram वापरकर्त्यांना पोस्ट सारख्या स्टोरी विभागात कमेंट करण्याचा पर्याय देखील मिळेल.