Instagram युजर्ससाठी लाँच झालं नवीन अपडेट (फोटो सौजन्य- pinterest)
सोशल मिडीया प्लॅटफॉर्म त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन अपडेट लाँच करत असतात, ज्यामुळे युजर्सचा सोशल मिडीया वापरण्याचा अनुभव अधिक चांगला होईल. असंच एक नवीन अपडेट लोकप्रिय इमेज आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म Instagram ने देखील लाँच केलं आहे. या नवीन अपडेटनुसार आता युजर्स Instagram वर एकाच वेळी 20 फोटो-व्हिडिओ शेअर करू शकणार आहेत. यापूर्वी Instagram वर युजर्स एकाच वेळी 10 फोटो-व्हिडिओ शेअर करू शकत होते. मात्र आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. ज्या युजर्सना Instagram वर कॅरोसेल पोस्ट शेअर करायला आवडतात, त्यांच्यासाठी हे नवीन फीचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
हेदेखील वाचा- Microsoft च्या सेवा का झाल्या होत्या ठप्प; कारण आलं समोर, Crowdstrike ने दिलं स्पष्टीकरण
2017 मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने इंस्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी कॅरोसेल फीचर लाँच करण्यात आलं होतं. या फीचरमध्ये तुम्हाला पुढील पोस्ट पाहण्यासाठी तुम्हाला स्वाइप करावं लागेल. या फीचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे युजर्स त्यांच्या गॅलरीमधून एका पोस्टमध्ये 20 फोटो शेअर करू शकतात. हे फीचर Instagram वर कमी कालावधीतच अधिक लोकप्रिय झाले. कंपनी आता कॅरोसेल फीचर अपडेट करण्याच्या तयारीत आहे. नवीन अपडेट लाँच करण्यात आल्यानंतर युजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram वर एकाच वेळी 20 फोटो-व्हिडिओ शेअर करू शकणार आहेत.
इंस्टाग्रामच्या कॅरोसेल पोस्ट फीचरद्वारे युजर्स एकाच वेळी अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतात. मात्र यापूर्वी ही मर्यादा 10 फोटो इतकी होती. आता ही मर्यादा वाढवण्यात आली असून युजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram वर एकाच वेळी 20 फोटो-व्हिडिओ शेअर करू शकणार आहेत. तुम्ही पोस्टच्या खाली दिसणाऱ्या 3 डॉटद्वारे कॅरोसेल पोस्ट ओळखू शकता. या फीचरमध्ये तुम्हाला पुढील पोस्ट पाहण्यासाठी तुम्हाला स्वाइप करावं लागेल. या फीचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे युजर्स त्यांच्या गॅलरीमधून एका पोस्टमध्ये 20 फोटो शेअर करू शकतात.
हेदेखील वाचा- Netflix प्रमाणे, Disney+ Hotstar देखील घालणार पासवर्ड शेअरिंगवर बंदी, ‘या’ महिन्यापासून नवे नियम होणार लागू
Instagram वर Reels फीचर सुरु करण्यात आल्यापासून युजर्स फोटोंपेक्षा व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा अधिक वापर करतात. भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी Instagram चा सर्वाधिक वापर केला जाऊ लागला. युजर्स फोटोपेक्षा व्हिडिओवर जास्त फोकस करत आहेत. मात्र कंपनीला हा प्लॅटफॉर्म केवळ व्हिडीओ शेअरिंगरपुरताच मर्यादित ठेवायचा नाही, त्यामुळे कंपनीने फोटो शेअरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी कॅरोसेल फीचर अपडेट केलं आहे.
सध्या केवळ मर्यादित युजर्ससाठीच नवीन फीचर लाँच करण्यात आलं आहे. कंपनीने सांगितलं की, हे फीचर जागतिक स्तरावर प्रसिद्ध केलं जात आहे. युजर्सना हळूहळू त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर अपडेट्स मिळू लागले आहेत. Instagram च्या नवीनतम फीचर्ससह, युजर्स एकाच वेळी 20 फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यास सक्षम असतील.