Disney+ Hotstar देखील घालणार पासवर्ड शेअरिंगवर बंदी (फोटो सौजन्य- pinterest)
सर्वांचा आवडता स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म Netfix ने पासवर्ड शेअरिंग वर बंदी घातली आहे. आता Netflix प्रमाणेच आणखी एक स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म पासवर्ड शेअरिंगवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. Disney+Hotstar देखील आता पासवर्ड शेअरिंगवर बंदी घालणार आहे. त्यामुळे Disney+Hotstar युजर्स त्यांच्या मित्रांसोबत पासवर्ड शेअर करू शकणार नाहीत. येत्या सप्टेंबरपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. या नविन नियमामुळे Disney+Hotstar च्या युजर्स मध्ये वाढ होईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.
हेदेखील वाचा- Google Gemini AI: ‘या’ युजर्सना Gmail वर मिळणार गुगलच्या Gemini AI ची मोफत सुविधा!
Disney+ Hotstar या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मवर युजर्स आता त्यांच्या मित्रांसोबत पासवर्ड शेअर करू शकणार नाही. यापूर्वी Netflix ने पासवर्ड शेअरिंगवर बंदी घातली होती. Disney चे सीईओ बॉब एगर म्हणाले की, आम्ही सप्टेंबरपासून आमच्या OTT प्लॅटफॉर्मवर पासवर्ड शेअरिंगवर बंदी घालणार आहोत. यानंतर, युजर्स त्यांचे पासवर्ड मित्रांसोबत शेअर करू शकणार नाहीत. यामुळे कंपनीचे युजर्स वाढतील, अशी कंपनीला आशा आहे.
नवीन नियम लागू करण्यासोबतच कंपनी त्यांच्या युजर्सना पासवर्ड शेअर करण्याच्या प्लॅन्सबद्दल माहिती देत आहे. म्हणजेच आता युजर्सना पासवर्ड शेअर करण्यासाठी अतिरिक्त पेमेंट करावं लागणार आहे. कंपनी अनेक देशांमध्ये हा प्लान लाँच करणार आहे. ही योजना लवकरच सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. या नवीन प्लॅनमध्ये युजर्सना किती अतिरिक्त पेमेंट करावं लागणार आहे किंवा हा नविन प्लॅन नक्की कधी पासून सुरू होणार आहे याबाबत कंपनीने अद्याप फारशी माहिती दिली नाही.
हेदेखील वाचा- UPI लाईट अनेक युजर्ससाठी ठरतय वरदान! कोणत्याही पिनशिवाय करू शकता झटपट पेमेंट
लोकप्रिय स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म Netflix ने गेल्या वर्षी पासवर्ड शेअरिंगवर बंदी घातली होती. त्यामुळे Netflix युझर्स त्यांचा ओटीटी प्लॅटफॉर्म पासवर्ड त्यांच्या मित्रांसोबत शेअर करू शकत नाहीत. आता या यादीत इतर ओटीटी प्लॅटफॉर्म देखील सामील होत आहेत. पासवर्ड शेअरिंगवर बंदी आणि परवडणाऱ्या योजना सुरू असल्याने कंपन्याच्या युजर्स संख्येत वाढ होऊन सबस्क्रिप्शन वाढलं आहे. Netflix प्रमाणेच आता Disney+Hotstar देखील पासवर्ड शेअरिंग थांबवून ग्राहकांची संख्या वाढवण्यावर भर देत आहे. त्यामुळे आता Disney+ Hotstar या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मवर युजर्स आता त्यांच्या मित्रांसोबत पासवर्ड शेअर करू शकणार नाही. पण तरीही युजर्सना त्यांच्या मित्रांसोबत पासवर्ड शेअर करायचा असल्यास कंपनी युजर्सना पेड प्लॅन ऑफर कर करणार आहे.
कंपनी त्यांच्या युजर्सना पासवर्ड शेअर करण्याच्या प्लॅन्सबद्दल माहिती देत आहे. आता युजर्सना पासवर्ड शेअर करण्यासाठी अतिरिक्त पेमेंट करावं लागणार आहे. या नविन नियमामुळे Disney+Hotstar च्या युजर्स मध्ये वाढ होईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. या नवीन प्लॅनमध्ये युजर्सना किती अतिरिक्त पेमेंट करावं लागणार आहे किंवा हा नविन प्लॅन नक्की कधी पासून सुरू. होणार आहे याबाबत कंपनीने अद्याप माहिती फारशी माहिती दिली नाही. कंपनी अनेक देशांमध्ये हा प्लान लाँच करणार आहे.