या देशांमध्ये भारतापेक्षा स्वस्त आहे iPhone 16 सिरीज, 44000 रुपयांपर्यंत कमी आहे किंमत
ॲपलने नुकतीच आपली नवीन iPhone 16 सिरीज भारतात लाँच केली आहे. या सिरीजमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. सीरिजच्या iPhone 15 आणि Plus मॉडेल्समध्ये एकदम नवीन कॅमेरा डिझाइन देण्यात आला आहे. तर प्रो मॉडेल्समध्ये मोठे डिस्प्ले देण्यात आले आहेत. भारतात या सिरींजची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे मात्र तुम्हाला माहिती आहे का? जगात असेही काही देश आहेत जिथे iPhone 16 सिरीजची सुरुवातीची किंमत भारतापेक्षा खूपच कमी आहे. तुम्ही जर या देशांतून आयफोन खरेदी केलात तर तुमचे हजारो रुपये वाचू शकतात.
iPhone 16 सीरीजमध्ये एकूण चार मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. यातील iPhone 16 ची किंमत 79,900 रुपये, iPhone 16 Plus ची किंमत 89,900 रुपये, Pro 1,19,900 रुपये आणि Pro Max ची 256GB व्हेरिएंटची किंमत 1,44,900 रुपये आहे. या सीरिजसाठी प्री-ऑर्डर 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुरू होणार आहे. तर याची विक्री 20 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.
हेदेखील वाचा – iPhone 16 lineup launched: नवीन सिरीज लाँच करताच ॲपलने बंद केले iPhone 15 Pro आणि iPhone 13
अमेरिकेत iPhone 16’च्या बेस मॉडेलची किंमत 67,096 रुपये आहे. तर प्लस 75,490 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. iPhone 16 Pro अमेरिकेत $999 किमतीत लाँच करण्यात आला आहे. जे भारतीय चलनात अंदाजे 83,890 रुपये आहे. प्रो मॅक्स मॉडेल $1,199 (सुमारे 100,687 रुपये) मध्ये आले आहे. किंमतीच्या बाबतीत, ही सिरीज अमेरिकन बाजारपेठेत सर्वात स्वस्त आहे. अमेरिकेत iPhone 15 Pro Max ची किंमत भारताच्या तुलनेत अवघे सुमारे 44,000 रुपये कमी आहे.
हेदेखील वाचा – iPhone 16 येताच iPhone 15 आणि 14 च्या किमतीत मोठी कपात, त्वरित जाणून घ्या नवीन किमती
स्वस्त आयफोनच्या बाबतीत अमेरिकेनंतर दुसरा क्रमांक चीनचा लागतो. इथेही ॲपलची प्रत्येक सिरीज भारताच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. यानंतर हाँगकाँग आणि दुबई हे देश या यादीत समाविष्ट आहेत. व्हिएतनाममध्येही आयफोन 16 सीरिजच्या किमती भारतापेक्षा कमी आहेत. याशिवाय जपानमध्ये 125,000 येन (सुमारे 73,205 रुपये) मध्ये iPhone 16 लाँच करण्यात आला आहे. यूके आणि फ्रान्स हे देखील देश आहेत जेथे आयफोनच्या किमती फार कमी आहेत.