ॲपलने 9 सप्टेंबर रोजी नवीनतम iPhone 16 लाइनअप लाँच केला आहे. कंपनीने नवीन मॉडेल सादर केले आहेत ज्यात iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, आणि iPhone 16 Pro Max यांचा समावेश आहे. ॲपल इंटेलिजन्स फीचर्ससह नवीन आयफोन मॉडेल्स बाजारात दाखल झाले आहेत. त्यातच आता कंपनीने नवीन आयफोन मॉडेल्ससह जुने मॉडेल्स बंद केले असल्याची माहिती मिळत आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
iPhone 16 लाइनअप लाँच केल्यानंतर, कंपनीने Apple Watch Series 9, Apple Watch Ultra 2 आणि iPhone SE 2 बंद केले आहेत. यासोबतच iPhone 15 Pro, Pro Max, iPhone 14 Plus आणि iPhone 13 देखील बंद करण्यात आले आहेत. अहवालांवर विश्वास ठेवला तर, कंपनी iPad mini 6, iPad 10 आणि AirPods 2 सोबत AirPod 3 बंद करण्याचा विचार करत आहे.
हेदेखील वाचा – iPhone 16 येताच iPhone 15 आणि 14 च्या किमतीत मोठी कपात, त्वरित जाणून घ्या नवीन किमती
ॲपलने डिव्हाइससह काही ॲक्सेसरीजलाही आता बाय-बाय केले आहे. ॲपलने चामड्याला पर्याय म्हणून FineWoven मटेरियल आणले होते. ॲपलने जुन्या मॉडेलसाठी FineWoven iPhone केसेस आपल्या वेबसाइटवरून काढून टाकल्या आहेत. कंपनीने iPhone 16 सीरीजसाठी सिलिकॉन केस आणि क्लिअर केस सादर केले आहेत.
हेदेखील वाचा – Airtel युजर्सना मिळत आहे एक्स्ट्रा डेटा, ही सुवर्णसंधी चुकवू नका! या रिचार्ज प्लॅन्सवर उपलब्ध आहे फेस्टिव्ह ऑफर
नेहमीप्रमाणे सप्टेंबरमध्ये कंपनीने आपली नवीन सिरीज लाँच केली आहे. नवीनतम iPhone 16 मध्ये युजर्सना आता एक नवीन चिपसेट पाहायला मिळेल. कंपनी Apple A18 प्रोसेसर देऊ शकते. यामध्ये युजर्सना 6.1-इंचाचा डिस्प्ले देखील उपलब्ध होईल. याशिवाय या स्मार्टफोनच्या डिझाईनच्या बाबतीतही मोठा बदल पाहायला मिळू शकतो. फोनमध्ये iOS 18 दिला जाईल. यासोबतच ॲपल इंटेलिजन्सचाही सपोर्ट यात असणार आहे. कंपनी ॲक्शन बटण आणि प्रो मॉडेलसारखे नवीन बटण देऊ शकते. या सीरिजसाठी प्री-ऑर्डर 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुरू होणार आहे. तर याची विक्री 20 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येईल.