ॲपलने आपल्या Glowtime इव्हेंटमध्ये iPhone 16 सिरीज लाँच केली आहे. ही सिरीज Apple Intelligence सह आणण्यात आली आहे. यावेळी सर्व मॉडेल्समध्ये ॲक्शन बटण देण्यात आले आहे. तसेच, सर्व iPhone मॉडेल्समध्ये 48MP मुख्य कॅमेरा आहे. नवीन iPhone लाँच करण्यासोबतच कंपनीने जुन्या iPhone 15 आणि iPhone 14 च्या किमती कमी केल्या आहेत.
आयफोन 16 च्या 128 GB व्हेरियंटची सुरवातीची किंमत $799 आणि iPhone 16 Plus साठी $899 वर सेट केली गेली आहे. त्याचबरोबर Apple चा जुना iPhone 15 आता जवळपास 10 हजार रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. म्हणजेच आता, ग्राहकांना आता 128 GB व्हेरियंटसाठी $699 (रु. 58,688) द्यावे लागतील.
हेदेखील वाचा – iPhone 16 vs iPhone 15: आयफोन 15 पेक्षा आयफोन 16 किती वेगळा आहे? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी
ॲपल iPhone 14 ची किंमत देखील आता कमी करण्यात आली आहे. आयोफोन 14 देखील आता $599 म्हणजेच अंदाजे 50,000 रुपयांना खरेदी करता येईल. ही किंमत त्याच्या 128 GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. तुम्ही आता iPhone SE $429 च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता, जी अंदाजे 36000 रुपये इतकी आहे.
iPhone 16
128GB: 79,900 रुपये
256GB: 89,900 रुपये
512GB: 1,09,900 रुपये
iPhone 16 Plus
128GB: 89,900 रुपये
256GB: 99,900 रुपये
512GB: 1,19,900 रुपये
iPhone 16 Pro
128GB: 1,19,900 रुपये
256GB: 1,29,900 रुपये
512GB: 1,49,900 रुपये
1TB: 1,69,900 रुपये
iPhone 16 Pro Max
256GB: 1,44,900 रुपये
512GB: 1,64,900 रुपये
1TB: 1,84,900 रुपये
हेदेखील वाचा – Samsung Galaxy S24 आणि S23 सिरीजसाठी लाँच झालं नवीन अपडेट! AI फीचर्ससह फोन वापरण्याचा अनुभव होईस अधिक मजेदार
आपल्याला iPhone 16 मध्ये एक नवीन चिपसेट पाहायला मिळेल. Apple ॲपल A18 प्रोसेसर देऊ शकते. यामध्ये आम्हाला 6.1-इंचाचा डिस्प्ले देखील उपलब्ध होईल. याशिवाय या स्मार्टफोनच्या डिझाईनच्या बाबतीतही मोठा बदल पाहायला मिळू शकतो. फोनमध्ये iOS 18 दिला जाईल. यासोबतच ॲपल इंटेलिजन्सचाही सपोर्ट यात असणार आहे. कंपनी ॲक्शन बटण आणि प्रो मॉडेलसारखे नवीन बटण देऊ शकते. या सीरिजसाठी प्री-ऑर्डर 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुरू होतील. तर याची विक्री 20 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येईल