50MP ट्रिपल रियर कॅमेरासह iQOO 13 स्मार्टफोन लाँच, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
iQOO चा नवीन स्मार्टफोन अखेरी चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. शक्तिशाली प्रोसेसर आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसोबत iQOO 13 स्मार्टफोनने एँट्री केली आहे. iQOO 13 शक्तिशाली प्रोसेसर Snapdragon 8 Elite ने सुसज्ज आहे. iQOO चा हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या कंपनीच्या फ्लॅगशिप iQOO 12 ची जागा घेणार आहे. कंपनीचा नवीनतम स्मार्टफोन मायक्रो-वक्र किनार, 2K BOE LTPO डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. चला तर मग आता iQOO 13 स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशनवर नजर टाकूया.
हेदेखील वाचा- OpenAI ने रोलआऊट केलं नवं फीचर, आता ChatGPT मध्ये मिळणार हिस्ट्रीमधून सर्च करण्याचं ऑप्शन
12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज सह iQOO 13 स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट CNY 3,999 म्हणजेच सुमारे 47,200 रुपयांच्या
किमतीत चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. 16 GB रॅम सह फोनचा दुसरा व्हेरिअंट CNY 4,299 म्हणजेच सुमारे 50,800 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. यासह, 12GB + 512GB व्हेरिएंट CNY 4,499 म्हणजेच अंदाजे 53,100 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिएंट CNY 4,699 म्हणजेच अंदाजे 55,500 रुपयांमध्ये लाँच केले आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
16GB + 1TB सह त्याचा टॉप व्हेरिएंट CNY 5,199 म्हणजेच सुमारे 61,400 रुपयेला लाँच करण्यात आला आहे. iQOO चा हा स्मार्टफोन काळा, हिरवा, राखाडी आणि पांढरा या चार रंगांच्या पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. कंपनी लवकरच हा फोन भारतीय बाजारातही लाँच करणार आहे. मात्र याची तारीख अद्याप उघड करण्यात आली नाही.
डिस्प्ले: iQOO 13 स्मार्टफोनमध्ये 6.82-इंचाचा 2K BOE Q10 FHD+ 8T LTPO 2.0 OLED Q10 डिस्प्ले आहे. त्याची कमाल ब्राइटनेस 1800nits आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 3168 X 1440 पिक्सेल आहे आणि रिफ्रेश रेट 144Hz आहे. यासोबतच डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेरासाठी पंच होल कटआउट देण्यात आला आहे.
प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज: iQOO चा हा फोन Qualcomm Snapdragon 8 Elite चिपसेट सह लाँच करण्यात आला आहे. या फोनने AnTuTu बेंचमार्कवर 3 मिलियन स्कोअर केले आहेत. यासोबत, फोनमध्ये गेमिंगसाठी इन-हाउस Q2 चिप आहे, जी पीसी-स्तरीय 2K टेक्सचर सुपर रिझोल्यूशन आणि नेटिव्ह लेव्हल 144FPS सुपर फ्रेम रेट देते. हा फोन 16 GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 1TB UFS 4.0 स्टोरेज पर्यंत सपोर्ट करतो.
हेदेखील वाचा- Google Map Update: गुगल मॅपवर तुमचं आवडतं ठिकाण करा मार्क, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
ऑपरेटिंग सिस्टम: iQOO चा फ्लॅगशिप स्मार्टफोन Android 15 वर आधारित कंपनीच्या कस्टम यूजर इंटरफेस OriginOS 5 वर चालतो.
कॅमेरा: iQOO 13 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX921 आहे, जो OIS सपोर्टसह येतो. यासोबतच, फोनमध्ये 50MP Samsung S5KJN1 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP Sony IMX816 टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. iQOO च्या या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. यासोबतच चांगल्या इमेज क्वालिटीसाठी Nice 2.0 अल्गोरिदम सपोर्ट करण्यात आला आहे.
बॅटरी आणि चार्जिंग: कंपनीने iQOO 13 स्मार्टफोनमध्ये 6,150mAh बॅटरी दिली आहे. हा फोन 120W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
इतर फीचर्स: या फोनमधील चारही कॅमेरा मॉड्यूल्समध्ये एलईडी लाईट्स देण्यात आल्या आहेत, ज्याला कंपनीने एनर्जी हॅलो असे नाव दिले आहे. हे 6 डायनॅमिक इफेक्ट आणि 12 रंग कॉम्बिनेशन सपोर्ट आहे. यासह, फोनमध्ये इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर तसेच धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP69 + IP68 रेटिंग आहे. हा फोन 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट कनेक्टिव्हिटीसह येतो.