फोटो सौजन्य -iStock
हल्ली मोबाईलवरून फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन येणं, एखाद्या अनोळखी लिंकवर क्लिक करणं, यामुळे फसवणूक होण्याच्या घटना वाढत आहेत. यासाठी आता Truecaller ने एक नवीन स्कीम लाँच केली आहे. Truecaller Fraud Insurance असं या स्किमचं नाव आहे. या स्कीमअंतर्गत मोबाईल फ्रॉड झाल्यास त्या व्यक्तिला Truecaller व्दारे 10 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. Truecaller ची ही स्किम भारतातील अँड्रॉइड आणि iOS युजर्ससाठी उपलब्ध आहे.
Truecaller चे प्रीमियम युजर्स Truecaller Fraud Insurance स्कीमचा वापर करू शकतात. ही स्कीम युजर्ससाठी अॅन्युअल प्रीमियम सब्सक्रिप्शनसह उपलब्ध आहे. ज्या युजर्सकडे फॅमिली प्लॅन आहे, असे युजर्स देखील Truecaller Fraud Insurance स्कीमसाठी पात्र ठरतील. ज्या युजर्सकडे Truecaller चे सब्सक्रिप्शन नसेल असे युजर्स अपग्रेड करून या स्किमचा वापर करू शकतात. जगभरात Truecaller चे 400 मिलीयन युजर्स आहेत. केवळ भारतातच Truecaller युजर्सची संख्या 285 मिलियन आहे. त्यामुळे आपल्या युजर्सच्या सोयीसाठी Truecaller ने Truecaller Fraud Insurance लाँच केली आहे. जर तुमच्या सोबत मोबाईल फ्रॉड झाला आणि तुम्ही हे सिध्द केलं तर Truecaller Fraud Insurance अंतर्गत तुम्हासा 10 हजार रुपये दिले जाणार आहेत.
Truecaller Fraud Insurance स्कीम अक्टिवेट करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
तसेच तुमची ऑनलाईन फसवणूक झाल्यास तुम्ही नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून सरकारच्या 1930 कॉल करून फसवणुकीची तक्रार नोंदवू शकता. तुम्ही बँकेशी जोडलेल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून कॉल केल्यानंतरच तुमची तक्रार नोंदवली जाईल. तुम्हाला ही तक्रार २४ तासांच्या आत दाखल करावी लागेल.