Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयटेलचा नवा म्युझिक फोन लाँच; 2500 mAh बॅटरीसह सुपर लाउड साऊंड

आयटेलने म्युझिक 450 एलच्या माध्यमातून संगीतकेंद्री फीचर फोन सादर केला आहे. 13.4 मिमी स्लिम डिझाइन, 2.4 इंच QVGA डिस्प्ले, 1000 कॉन्टॅक्ट्स, टॉर्च, VGA कॅमेरा आणि Type-C चार्जिंगसारख्या सुविधांसह हा फोन दैनंदिन वापरासाठी तयार करण्यात आला आहे.itel music 450 l feature phone launch India 2026 auto news marathi

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 24, 2026 | 05:20 PM
आयटेलचा नवा म्युझिक फोन लाँच; 2500 mAh बॅटरीसह सुपर लाउड साऊंड
Follow Us
Follow Us:
  • आयटेल म्युझिक 450 एलमध्ये सुपर लाउड 3D साऊंड आणि 2500 mAh बॅटरीसह संगीताला प्राधान्य देण्यात आले आहे.
  • 13.4 मिमी स्लिम डिझाइनसोबत वायरलेस FM, ब्लूटूथ, टॉर्च, VGA कॅमेरा आणि 1000 कॉन्टॅक्ट्सची सुविधा मिळते.
  • प्रवास आणि मैदानी वापरासाठी तयार केलेल्या या फीचर फोनमध्ये Type-C चार्जिंग आणि ऑटो कॉल रेकॉर्डिंगसारख्या सुविधा आहेत.
भारतातील अग्रगण्य तंत्रज्ञान ब्रँड्सपैकी एक असलेल्या आयटेलने ‘आयटेल म्युझिक ४५० एल’ या म्युझिक-फर्स्ट फीचर फोनच्या लाँचची घोषणा केली. हा फोन मुख्यत्वे ‘सुपर लाउड ३डी साऊंड’ या वैशिष्ट्यावर आधारित आहे. टू-इन-वन सुपर लाउड स्पीकर, २५०० एमएएच बॅटरी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, २.४ इंच क्यूव्हीजीए डिस्प्ले आणि १३.४ मिमी स्लिम डिझाइन असलेला हा फोन दैनंदिन मनोरंजन, प्रवास आणि मैदानी वापरासाठी डिझाइन केला गेला आहे.

आयटेल म्युझिक ४५० एल हा फोन बस किंवा ट्रेनचा प्रवास, रस्त्यावरील थांबे, मैदानी वातावरण आणि सामाजिक कार्यक्रम यांसारख्या दैनंदिन प्रवासात ग्राहक ज्या पद्धतीने संगीत आणि मनोरंजनाचा आनंद घेतात, ते लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. जिथे सामान्य फोनचा आवाज स्पष्ट ऐकू येत नाही, अशा ठिकाणीही यातील ‘सुपर लाउड ३डी साऊंड’मुळे संगीत, एफएम आणि कॉल्स स्पष्टपणे ऐकू येतात.

इन्व्हर्टरवर घरातली कोणती उपकरणे चालवावीत? पावसाळ्यात अर्थिंग करणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या

या लाँचविषयी बोलताना *आयटेल इंडिया (ट्रांसन होल्डिंग्स) चे सीईओ अरिजित तालापात्रा* म्हणाले, “भारत हा असा देश आहे जिथे दैनंदिन प्रवास, मैदानी कामे आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये संगीत नेहमीच सोबत असते. अशा वेळी अनेकदा साधारण फोनचा आवाज ऐकू येणे कठीण होते. आयटेल म्युझिक ४५० एलच्या माध्यमातून आम्ही ‘सुपर लाउड ३डी साऊंड’वर केंद्रित असलेला एक वेगळा, म्युझिक-फर्स्ट अनुभव फीचर-फोन सेगमेंटमध्ये घेऊन येत आहोत. शक्तिशाली ऑडिओ, २५०० एमएएच बॅटरी आणि स्लिम डिझाइनचा मिलाफ साधून, आम्ही संपूर्ण भारतातील ग्राहकांच्या दैनंदिन जीवनशैलीला पूरक ठरेल असे तंत्रज्ञान निर्माण करण्याच्या आमच्या कटिबद्धतेला पुढे नेत आहोत.”

*दैनंदिन प्रवासासाठी डिझाइन केलेला सुपर लाउड ३डी साऊंड:*
आयटेल म्युझिक ४५० एलच्या केंद्रस्थानी असलेला एफ२० टू-इन-वन सुपर लाउड स्पीकर संगीत, एफएम आणि कॉल्ससाठी उत्कृष्ट ३डी साऊंड प्रदान करतो. हा स्पीकर १३.४ मिमी स्लिम डिझाइनसह जोडलेला असल्याने मोठ्या स्पीकरचा आवाज आणि स्लिम स्वरूप असा दुहेरी संगम यात पाहायला मिळतो.

दीर्घकाळ प्रवासात राहणाऱ्या ग्राहकांसाठी यात २५०० एमएएच क्षमता असणारी बॅटरी देण्यात आली आहे, जी संगीत, वायरलेस एफएम, ब्लूटूथ आणि कॉल्सचा अखंड आनंद घेण्यास मदत करते. तसेच, दैनंदिन वापराच्या सोयीसाठी यात २.४ इंचाचा क्यूव्हीजीए डिस्प्ले देण्यात आला आहे.

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!

*संगीत आणि दैनंदिन वापरासाठी सज्ज:*
म्युझिक ४५० एल मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहक सुसज्ज वायरलेस ॲक्सेसरीज जोडल्या जाऊ शकतात. याशिवाय, रेकॉर्डिंगची सोय असलेले ‘वायरलेस एफएम’ वायरच्या इअरफोन्सशिवाय मनोरंजनाचा आणखी एक पर्याय उपलब्ध करून देते.

दैनंदिन सुलभतेसाठी या फोनमध्ये ‘किंग टॉकर’, व्हिज्युअल आयकॉनसह १,००० कॉन्टॅक्ट्स सेव्ह करण्याची क्षमता, व्हायब्रेशन अलर्ट, ऑटो कॉल रेकॉर्डिंग, वेळ ऐकण्यासाठी ‘०’ बटणावर लाँग-प्रेस शॉर्टकट, एक शक्तिशाली टॉर्च आणि व्हीजीए कॅमेरा देण्यात आला आहे.

हा फोन टाईप-सी चार्जिंगसह येतो आणि बॉक्समध्ये एक मोफत बॅक कव्हर देखील दिले जाते. म्युझिक ४५० एल हा फोन तीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

Web Title: Itel music 450 l feature phone launch india 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • technology

संबंधित बातम्या

इन्व्हर्टरवर घरातली कोणती उपकरणे चालवावीत? पावसाळ्यात अर्थिंग करणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या
1

इन्व्हर्टरवर घरातली कोणती उपकरणे चालवावीत? पावसाळ्यात अर्थिंग करणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
2

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!
3

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
4

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.