Jio AI Doctors: 24 तास राहणार तुमच्यासोबत, आता डिजीटल पध्दतीने सेव्ह करा हेल्थ रेकॉर्ड (फोटो सौजन्य - pinterest)
दिग्गज टेक कंपनी रिलायन्स जिओने आता एक नवीन फीचर लाँच केलं आहे. जिओने AI Doctors नावाचे खास तंत्रज्ञान लाँच केलं आहे. तुमच्यासोबत 24 तास राहणारं आणि तुमच्या हेल्थचा सर्व रेकॉर्ड ठेवण्यासाठी जिओचं AI Doctors फीचर फार उपयोगी ठरू शकतं. Jio AI डॉक्टर तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात आणि आरोग्य सेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम करण्याची शक्यता आहे. AI डॉक्टर हा डिजिटल आरोग्य सहाय्यक आहे जो AI वापरून तुमच्या आरोग्य समस्यांचे निदान करतो आणि त्यावर उपाय देतो. हे 24/7 उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे आरोग्य प्रश्न कधीही, कुठेही विचारू शकता.
हेदेखील वाचा- Airtel तबब्ल 10 वर्षांनंतर बंद करणार विंक म्युझिक ॲप! सर्व कर्मचारी Airtel इकोसिस्टममध्ये होणार सहभागी
AI डॉक्टर हा जिओचा एक उपक्रम आहे जो आरोग्य सेवेच्या अनेक मोठ्या समस्या दूर करू शकतो. जिओ AI Doctors च्या मदतीने देशातील लाखो आणि करोडो लोकांना पूर्वीपेक्षा अधिक वेगाने आरोग्य उपचार मिळण्यास मदत होऊ शकते. Jio AI डॉक्टर हे वैद्यकीय आरोग्य उपचारांसाठी एक प्रगत डिजिटल साधन आहे जे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे समर्थित असेल. याबाबत जिओचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी घोषणा केली आहे. मुकेश अंबानी म्हणाले की, जिओ AI डॉक्टर आजच्या स्मार्टफोनप्रमाणेच लोकांपर्यंत सहज उपलब्ध असतील. ते लोकांच्या आजारांचा रेकॉर्ड ठेवतील, ज्यामुळे भविष्यात मदत होईल.
जिओचे व्हर्च्युअल AI डॉक्टर कोणत्याही वैद्यकीय स्थितीत तुमच्यासाठी सल्लागार म्हणून काम करण्यास सक्षम असतील. एवढेच नाही तर जिओ AI डॉक्टर तुमचा आजार अगदी सहज ओळखू शकतील, ज्यामुळे तुम्हाला पुर्वीपेक्षा जलद आरोग्य उपचार मिळण्यासाठी मदत होऊ शकेल. जिओचे व्हर्च्युअल डॉक्टर तुमचे आरोग्य रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने साठवून ठेवतील. जेव्हा तुम्ही कोणत्याही आजारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्याल तेव्हा तुम्ही जुन्या आरोग्य नोंदींमध्ये प्रवेश करू शकाल. हे AI डॉक्टर तुम्हाला तुमच्या आजारानुसार उपायही सुचवतील.
जिओ Ai डॉक्टरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे व्हर्च्युअल डॉक्टर 24/7 तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. तुम्ही कधीही तुमच्या व्हर्च्युअल डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सक्षम असाल. त्यामुळे रुग्णालयात जाण्याची गरज नाही. AI डॉक्टर तुमच्या आजारांचे अधिक जलद विश्लेषण करू शकतील आणि त्यांना दूर करण्यासाठी तुम्हाला उपाय सुचवतील. AI डॉक्टर तुमचा आरोग्य डेटा कायमचा डिजिटली रेकॉर्ड ठेवतात. ज्यामुळे भविष्यात गरज पडल्यास, तुम्हाला याआधी कोणती समस्या होती आणि त्यावर कोणत्या प्रकारचे उपचार केले गेले हे तुम्हाला सहज समजू शकेल.
हेदेखील वाचा- छोट्या माशापासून शक्तिशाली भालूपर्यंत कशी झाली उत्क्रांती? पाहा AI फोटो
तुम्ही AI डॉक्टरांना तुमची लक्षणे आणि आरोग्य समस्या सांगा. AI प्रणाली या लक्षणांचे विश्लेषण करते आणि संभाव्य रोग ओळखते. AI डॉक्टर तुमच्या लक्षणांवर आधारित संभाव्य रोग सुचवतात आणि योग्य उपचार पर्याय देतात. या सूचना वैद्यकीय डेटाबेस आणि संशोधनावर आधारित आहेत. AI डॉक्टर तुम्हाला उपचार आणि काळजी सल्ला तसेच डिजिटल समुपदेशन देतात, ज्यामुळे तुम्ही तुमची स्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. जरी AI डॉक्टर खूप उपयुक्त आहेत, तरीही त्यांना मानवी डॉक्टरांचा पर्याय मानता येणार नाही. AI डॉक्टर फक्त प्रथमोपचार देऊ शकतात आणि गंभीर आजारांसाठी रुग्णाला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देतात.