
JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत
जिओ ही भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. जिओचे करोडो युजर्स आहेत. या सर्व युजर्ससाठी कंपनी सतत नवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील काही प्लॅन्स त्यांच्या किंमतीसाठी बेस्ट आहेत तर काही प्लॅन्स त्यांच्या अनलिमिटेड फायद्यांसाठी ओळखले जातात. अशातच आपल्यासाठी कोणता प्लॅन बेस्ट ठरणार, याबाबत अनेकांना शंका असते.
कारण कंपनी यूजर्सच्या गरजेनुसार वेगवेगळे प्लॅन्स लाँच करत असते. काही प्लॅन्स प्रीपेड असतात तर काही प्लॅन्स पोस्टपेड असतात. आता आम्ही तुम्हाला अशा एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जो प्रीपेड आहे आमि कमी किंमतीत जास्तीचे फायदे ऑफर करतो. कंपनीचा हा प्लॅन यूजर्समध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 2.5GB डेली डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर फायदे ऑफर केले जातात. या सर्व फायद्यांमुळे यूजर्ससाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय ठरतो. हा प्लॅन सहसा अशा युजर्ससाठी बेस्ट ठरणार आहे, ज्यांना जास्त इंटरनेटची गरज असते. या प्लॅनची किंमत किती आहे आणि त्यामध्ये कोणते फायदे ऑफर केले जातात, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
जिओच्या या लोकप्रिय रिचार्ज प्लॅनची किंमत 399 रुपये आहे आणि कंपनीच्या या प्लॅनमध्ये 2.5GB हाय-स्पीड डेटा समाविष्ट आहे. इंटरनेट अॅक्सेससह, यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस संदेश मिळतात. जर तुम्ही त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घेतले तर तुम्हाला हा प्लॅन आकर्षक वाटेल.
Apple मध्ये होणार मोठा बदल! टिम कुक सोडणार CEO पद , कोण घेणार त्यांची जागा? या नावाची जोरदार चर्चा
कंपनीच्या या प्लॅनमध्ये जियो अनलिमिटेड ऑफर देखील समाविष्ट आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या युजर्सना 90 दिवसांसाठी जियो हॉटस्टार मोबाइल सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. त्यामुळे यूजर्स कोणत्याही अतिरिक्त चार्जशिवाय चित्रपट, शो आणि स्पोर्ट्स स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकणार आहेतत. याशिवाय, कंपनीच्या या प्लॅनमध्ये फाइल आणि डॉक्यूमेंट्ससाठी 50GB JioAI क्लाऊड स्टोरेज आणि जियो टीवीचा अॅक्सेस देखील मिळणार आहे. ज्यामुळे यूजर्सना या एकाच प्लॅनमध्ये इंटरनेट, एंटरटेनमेंट आणि क्लाउड सर्विसेजचे कॉम्बिनेशन मिळते.
कंपनीच्या या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या दरम्यान यूजर्स डेली डेटा, अनलिमिटेड कॉल, एसएमएस आणि सब्सक्रिप्शन सर्विसेजचा संपूर्ण आनंद घेऊ शकतात. हे रिचार्ज जिओच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाईल अॅपद्वारे सहज उपलब्ध आहे, ज्यामुळे गरज पडल्यास रिचार्ज करणे सोपे होते.
Ans: Jio 5G मोठ्या शहरांत उपलब्ध आहे आणि देशभरात टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे.
Ans: साधारण 2 ते 24 तासांत SIM पूर्णपणे अॅक्टिव्हेट होते.
Ans: होय, iPhone, Samsung, Google Pixel आणि काही अन्य स्मार्टफोन्समध्ये Jio eSIM सपोर्ट आहे.