गुगलमध्ये आणखी एका भारतीयाचा डंका! कोण आहेत प्रभाकर राघवन, ज्यांना सुंदर पिचाई यांनी गुगलमध्ये दिली मोठी जबाबदारी?
Google New Chief Technologist: गुगलने भारतीय वंशाचे प्रभाकर राघवन यांची कंपनीचे मुख्य तंत्रज्ञ म्हणजेच चीफ टेक्नॉलॉजिस्ट म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी, ते कंपनीमध्ये गुगल सर्च असिस्टेंट,जिओ ॲड्स कॉर्मस आणि पेमेंट प्रोडक्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष होते. गेल्या 12 वर्षांपासून ते गुगलमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. आता त्यांची चीफ टेक्नॉलॉजिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत गुगलचे सिईओ सुंदर पिचाई यांनी माहिती दिली आहे. त्यांच्या या प्रगतीसाठी त्यांचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे. गुगलमध्ये चीफ टेक्नॉलॉजिस्ट बनलेल्या प्रभाकर यांनी आयआयटी मद्रासमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले आहे.
हेदेखील वाचा- गुगल चॅटमध्ये नोटिफिकेशन कसं मेनेज कराल? या सोप्या स्टेप्स तुम्हाला करतील मदत
सर्च इंजिन कंपनी गुगलने भारतीय वंशाचे प्रभाकर राघवन यांची नवीन मुख्य तंत्रज्ञ म्हणून नियुक्ती केली आहे. राघवन यांच्या आधी निक फॉक्स ही जबाबदारी सांभाळत होते. यापूर्वी प्रभाकर राघवन गुगल सर्च, असिस्टंट, जिओ, ॲड्स, कॉमर्स आणि पेमेंट प्रॉडक्ट्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष होते. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी प्रभाकर राघवन यांना देण्यात आलेल्या नव्या जबाबदारीबाबत ब्लॉग पोस्ट लिहून माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, राघवन गेल्या 12 वर्षांपासून गुगलमध्ये टीमचे नेतृत्व करत आहेत. आता ते कंपनीचे मुख्य तंत्रज्ञ पद सांभाळतील. सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, राघवन थेट सुंदर पिचाई यांना रिपोर्ट करणार आहेत. (फोटो सौजन्य – X)
या अहवालात असे म्हटले आहे की, कंपनीने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे जेव्हा आघाडीची टेक कंपनी आपल्या वाढीसाठी टीममध्ये सुधारणा करत आहे. कंपनीला वाढत्या स्पर्धेचाही सामना करावा लागत आहे. यासोबतच गुगल सर्च आणि ॲडव्हर्टायझिंगशी संबंधित व्यवसायातील मक्तेदारीबाबत कंपनीवर जागतिक स्तरावर खटले सुरू आहेत.
हेदेखील वाचा- Elista ने भारतात लाँच केला 85 इंचाचा Google TV, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
गुगलमध्ये चीफ टेक्नॉलॉजिस्ट बनलेले प्रभाकर राघवन यांनी आयआयटी मद्रासमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले आहे. यासोबतच त्यांनी यूसी बर्कले येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी केली आहे. यासोबतच ते स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये कंसल्टिंग प्रोफेसर म्हणूनही कार्यरत आहेत. यासोबतच ते एसीएम जर्नलचे मुख्य संपादकही राहिले आहेत.
गुगलमध्ये सामील होण्यापूर्वी, प्रभाकर राघवन यांनी Yahoo Labs ची स्थापना केली आणि ते त्या टीमचे नेतृत्व करत होते. येथे त्यांची जबाबदारी सर्च आणि ॲड्स रँकिंगसह जाहिरात मार्केट प्लेस डिझाइन करण्याची होती. व्हेरिटीचे सीटीओ असण्यासोबतच त्यांनी 14 वर्षांच्या कारकिर्दीत आयबीएममध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
राघवन गेल्या 20 वर्षांपासून अल्गोरिदमवर काम करत आहेत. यासोबतच त्यांनी वेब सर्च आणि डेटाबेसशी संबंधित 100 हून अधिक पेपर्स प्रकाशित केले आहेत. याआधी ते गुगल क्लाउड या गुगल ॲप्सचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली, गुगलचा ॲप बिझनेस ग्राहक ॲपपासून बिझनेस सोल्युशनमध्ये वाढला आहे. गुगलच्या क्लाउड व्यवसायाचा विस्तार करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. यासह त्याने G Suite मध्ये मशीन इंटेलिजेंस फीचर जोडले.