Elista ने भारतात लाँच केला 85 इंचाचा Google TV, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Elista ने भारतीय बाजारपेठेत आपला सर्वात मोठा आकाराचा टीव्ही लाँच केला आहे. या टीव्हीचा आकार 85 इंचाचा आहे, जो Google TV वर चालतो. आतापर्यंत कंपनीने भारतीय बाजारात 32 इंच ते 65 इंचापर्यंतचे टीव्ही लाँच केले होते. मात्र आता पहिल्यांदाच कंपनीने 85 इंच आकाराचा आपला सर्वात मोठा टिव्ही लाँच केला आहे. कंपनीचा नवीन स्मार्ट टीव्ही 4K दर्जाचा असेल. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी हा टीव्ही घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी लाँच केला आहे. Elista च्या लेटेस्ट टीव्हीच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया.
हेदेखील वाचा- गुगल मॅपही देतोय प्रभू रामांच्या अयोध्येतील प्रवासाची साक्ष, पुराणातील हा दावा ठरतोय खरा
Elista 85 इंचाचा गुगल टीव्ही भारतीय बाजारपेठेत 1,60,900 रुपये किंमतीला लाँच करण्यात आला आहे. हा नवीन टीव्ही सर्व प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच हा टीव्ही Amazon India आणि Flipkart वरून ऑनलाइन खरेदी करता येईल. याशिवाय इतर लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही हा टीव्ही खरेदी करता येईल.
डिस्प्ले – Elista च्या या टिव्हीमध्ये 85-इंच 4K HDR आणि HDR 10 सपोर्ट देण्यात आला आहे.
ऑपरेटिंग सिस्टम: गुगल असिस्टंटसह गुगल टीव्ही ऑपरेट केला जाऊ शकतो
ऑडिओ: Elista च्या या टिव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ आहे.
कनेक्टिव्हिटी: टिव्हीमध्ये ब्लूटूथ, ड्युअल-बँड वाय-फायची सुविधा देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- अभ्यासापासून खेळण्यापर्यंत AI बदलणार जग, प्रत्येक कामात होणार हस्तक्षेप
पोर्ट्स: 3 x HDMI, 2 x USB, 1 x AV, RF, इथरनेट (RJ45)
रिमोट: व्हॉइस-सक्षम असलेल्या हॉटकीज
वैशिष्ट्ये: स्क्रीन मिररिंग, बिल्ट-इन Chromecast
डिस्प्ले आणि ऑडिओ अनुभव: Elista 85 इंचाच्या गुगल टीव्हीमध्ये, कंपनीने बेझल-लेस डिझाइनसह एक चमकदार 4K HDR डिस्प्ले दिला आहे, जो HDR 10 ला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले वाइब्रेंट रंग आणि स्पष्टता देतो. Elista चा हा टीव्ही डॉल्बी ऑडिओ तंत्रज्ञानासह सादर करण्यात आला आहे, जो वापरकर्त्यांना इमर्सिव्ह ध्वनी गुणवत्ता प्रदान करतो. या टीव्हीबाबत कंपनीचा दावा आहे की, हा युजर्सना घरबसल्या सिनेमाचा अनुभव देतो.
स्मार्ट वैशिष्ट्ये: Elista चा हा टीव्ही गुगल टीव्ही प्लॅटफॉर्मवर चालतो. वापरकर्त्यासाठी अनुकूल इंटरफेससह, हा टीव्ही वापरकर्त्याच्या पाहण्याच्या सवयींवर आधारित पर्सनलाइज्ड कंटेंट रिकमेंडेशन देखील देतो. यासह, वापरकर्ते वेगवेगळ्या OTT ॲप्सवर त्यांची वॉच लिस्ट देखील तयार करू शकतात. यासोबतच या टीव्हीच्या रिमोटमध्ये हॉटकीसह व्हॉईस कंट्रोलसाठी गुगल असिस्टंट बटण देखील आहे.
कनेक्टिव्हिटी: Elista चा नवीनतम टीव्ही बिल्ट-इन Google Chromecast सह येतो. यासह, वापरकर्ते नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूब सारख्या ॲप्सला व्हॉईस कमांड फीचर Hey Google सह नियंत्रित करू शकतात. टीव्हीमध्ये ड्युअल बँड वाय-फाय (5GHz/2.4GHz), ब्लूटूथ, स्क्रीन मिररिंग आणि HDMI आणि USB पोर्ट सारख्या कनेक्टिव्हिटीसाठी इतर अनेक पर्याय आहेत.