Laptop Tips: लॅपटॉपच्या बॅटरी लाईफ समस्येने हैराण झालात? या टीप्स करतील मदत
सध्याच्या डिजीटल जगात लॅपटॉपशिवाय आपलं एकही काम पूर्ण होत नाही. शाळा, कॉलेज, ऑफीस सर्वत्र आपल्याला लॅपटॉपची गरज असते. व्यावसायिक किंवा वैयक्तिक जीवन असो, लॅपटॉपशिवाय एका दिवसाची कल्पना करणं देखील कठीण आहे. आपल्याकडे लॅपटॉप नसेल तर आपली अनेक कामं रखडतात. लॅपटॉप आपल्या प्रत्येक कामासाठी प्रचंड उपयोगी ठरत आहे. दिवसेंदिवस होत असलेल्या प्रगतीमुळे लॅपटॉपमध्ये अनेक नवीन फीचर्स अॅड केले जात आहेत, जेणेकरून लॅपटॉपचा वापर पूर्वीपेक्षा अधिक मजेदार होऊ शकेल.
हेदेखील वाचा- Google Map Update: स्पीड चलानपासून सुरक्षित राहण्यासाठी गुगल मॅप करेल मदत, फक्त करा ही सेटिंग
काळानुसार लॅपटॉपमधील फीचर्स आणि टेक्नोलॉजी खूप प्रगत होत आहे. या प्रगत फीचरच्या मदतीने आपण आपलं काम सहज करू शकतो. पण ही सर्व काम होत असताना सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे लॅपटॉपची बॅटरी. तुमचा लॅपटॉप कितीही चांगला असला पण त्याची बॅटरी लाईफ खराब असेल, तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे लॅपटॉप युजर्सना बॅटरीबद्दल मोठी चिंता असते. (फोटो सौजन्य – pinterest)
आजकाल अनेक लॅपटॉप दीर्घकाळ बॅटरी बॅकअप देतात परंतु इंटरनेट आणि मल्टीटास्किंगमुळे, बॅटरीच्या कार्यक्षमतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. यासोबतच लॅपटॉपची बॅटरी लाइफ कालांतराने कमी होत राहते. जर तुम्हालाही तुमच्या लॅपटॉपच्या बॅटरी लाइफबद्दल काळजी वाटत असेल, तर आम्ही तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लाइफ अॅडजस्ट करू शकता.
चांगल्या बॅटरी बॅकअपसाठी, तुमचा लॅपटॉप बेस्ट पावर एफिशिएंसी मोडवर ठेवा. यामुळे तुमच्या लॅपटॉपची बॅटरी हळूहळू संपेल. यासोबतच तुमच्या लॅपटॉपच्या परफॉर्मंसवरही परिणाम होणार नाही. हा मोड अशा युजर्ससाठी सर्वोत्तम आहे जे बहुतेक लॅपटॉपवर टायपिंगचे काम करतात आणि त्यांना लॅपटॉपवर भारी ग्राफिक्स किंवा कोडिंगचे काम करावे लागत नाही.
तुमचा लॅपटॉप नेहमी एनर्जी सेविंग मोडमध्ये ठेवा. असे केल्याने, तुमच्या लॅपटॉपची बॅटरी 30 टक्क्यांपर्यंत पोहोचताच, हा मोड इनेबल होईल. असे केल्याने, लॅपटॉपचा परफॉर्मंस थोडी कमी होईल आणि बॅटरी वाचेल, ज्यामुळे तुम्हाला अधिक बॅकअप मिळेल.
हेदेखील वाचा- चार्जिंग करताना Apple iPhone 14 Pro Max चा ब्लास्ट! कंपनीने चाचणीसाठी मागितला डिव्हाईस
जेव्हा तुम्ही तुमचा लॅपटॉप वापरत नसाल तेव्हा ऑटो बंद ठेवा. ऑटो निवडून स्क्रीन बंद ठेवा. तसेच, जर तुम्ही चहासाठी किंवा लहान ब्रेकसाठी उठत असाल तर लॅपटॉप चालू ठेवण्याऐवजी हायबरनेशन मोडवर ठेवा. हे वीज वापरणार नाही आणि बॅटरी वाचवेल.
तुमची लॅपटॉप स्क्रीन ऑटो ब्राइटनेसवर सेट करा. याच्या मदतीने तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्क्रीनची ब्राइटनेस सेट केली जाईल. हे बॅटरीचे आयुष्य बॅलेंस करण्यात खूप मदत करते.
लॅपटॉपच्या सेटिंग्जमध्ये जा आणि क्लोज लिड टू स्लीप अॅक्टिवेट करा. याच्या मदतीने तुम्ही जेव्हाही लॅपटॉप बंद कराल तेव्हा लॅपटॉप स्लीप मोडमध्ये जाईल. यामुळे बॅटरी कमी खर्च होईल. लॅपटॉप चार्जिंगला तासनतास सोडू नये याची काळजी घ्यावी लागेल. बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर चार्जर अनप्लग करा. नेहमी फक्त ऑफिशियल चार्जर वापरा. लॅपटॉपची बॅटरी लवकर संपत असल्यास ऑथराइज्ड सर्विस सेंटरमध्ये नेऊन त्वरित तपासणी करून घ्या.