Google Map Update: स्पीड चलानपासून सुरक्षित राहण्यासाठी गुगल मॅप करेल मदत, फक्त करा ही सेटिंग
गुगल मॅप्सने नुकतेच एक नवीन फीचर लाँच केले आहे, जे तुम्हाला रिअल टाइममध्ये स्पीड लीमिटबद्दल माहिती देते. हे फीचर स्पीडोमीटर म्हणून ओळखलं जाऊ शकतं. रस्ता सुरक्षेला प्रोत्साहन देणे आणि वेगाला प्रतिबंध करणे, या उद्देशाने गुगल मॅप्सने हे नवीन फीचर लाँच केलं आहे. गुगल मॅप्सचं हे नवीन फीचर स्ट्रीट व्यू आणि थर्ड पार्टी इमेजरी इत्यादींमधून वेग मर्यादा ओळखण्यासाठी AI वापरते. रस्ता सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि चालकांना वेग मर्यादा पाळण्यास मदत करण्यासाठी, गुगल मॅप्सने अलीकडेच हे फीचर जागतिक स्तरावर लाँच केलं आहे.
हेदेखील वाचा- Google Map Update: iPhone वर गुगल मॅपला डिफॉल्ट नेविगेशन अॅप बनवायचं? या सोप्या टीप्स तुम्हाला करतील मदत
ड्रायव्हर्सना मदत करण्यासाठी आणि ड्रायव्हर्सना उत्तम सुरक्षितता आणि नेव्हिगेशन सहाय्य प्रदान करण्यासाठी, गुगल मॅप्सने स्पीडोमीटर फीचर विकसित केले आहे, जे जगभरातील रस्त्यांसाठी रिअल-टाइम स्पीड लीमिट माहिती दर्शवते. तुम्ही ही सुविधा कशी वापरू शकता याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
हेदेखील वाचा- Google Map Update: आता गुगल मॅप रस्त्याची रुंदीसुध्दा सांगणार, 8 शहरांमध्ये सुरू होतेय नवी सुविधा