Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI Alert: एक चूक आणि भलत्याच अकाऊंटला ट्रांसफर झाले पैसे? घाबरू नका, रिफंड मिळवण्यासाठी लक्षात ठेवा ‘हे’ महत्त्वाचे नियम

UPI वापरताना ज्या व्यक्तीला पैसे ट्रांसफर करत आहात त्याची संपूर्ण माहिती वाचा. त्याचे नाव आणि नंबर योग्य असल्याची खात्री करा, नंतरच व्यवहार पूर्ण करा. जर निष्काळजीपणा केला तर पैसे चुकीच्या अकाऊंटमध्ये ट्रांसफर होऊ शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 04, 2026 | 10:14 AM
UPI Alert: एक चूक आणि भलत्याच अकाऊंटला ट्रांसफर झाले पैसे? घाबरू नका, रिफंड मिळवण्यासाठी लक्षात ठेवा 'हे' महत्त्वाचे नियम

UPI Alert: एक चूक आणि भलत्याच अकाऊंटला ट्रांसफर झाले पैसे? घाबरू नका, रिफंड मिळवण्यासाठी लक्षात ठेवा 'हे' महत्त्वाचे नियम

Follow Us
Follow Us:
  • तुम्ही चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले?
  • पैसे परत मिळवायचे असतील तर समोरच्या व्यक्तीची परवानगी असणे अत्यंत गरजेचे
  • NPCI तपास करते आणि केस वैध असल्यास बँकेला पैसे परत करण्याचे निर्देश
आजच्या काळात यूपीआय पेमेंट आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा हिस्सा बनला आहे. भाजी खरेदी करण्यापासून मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करण्यापर्यंत सर्व ठिकाणी यूपीआय पेमेंटचा वापर केला जातो. फक्त क्लिक करा, पासवर्ड टाका आणि तुमचे पैसे बँक अकाउंटमधून ट्रान्सफर होतात. अशावेळी सुट्ट्या पैशांची कटकट किंवा पॉकेट बाळगण्याची गरज पडत नाही. यूपीआय पेमेंटमुळे आपले आयुष्य अत्यंत सोपं आणि आरामदायी झाले आहे. पण हाच आरामा काही वेळेस आपल्यासाठी मोठी समस्या बनू शकतो. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मोठी रक्कम ट्रांसफर करता आणि त्यानंतर तुम्हाला समजतं की तुम्ही चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले आहे… अशा परिस्थितीत काय करावं हे अनेकांना सुचत नाही आणि लोकं घाबरून जातात. आपण ट्रान्सफर केलेली रक्कम आता आपल्याला परत मिळणार नाही असे देखील अनेकांना वाटतं.

Airtel Update: कोट्यवधी यूजर्सना झटका! टेलिकॉम कंपनीने हटवली मोफत मिळणारी ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या सविस्तर

ऑनलाइन यूपीआय पेमेंट अशा प्रकारे डिझाईन करण्यात आलं आहे की तुम्ही स्कॅन करून, रक्कम आणि पासवर्ड टाकून जेव्हा ओकेवर क्लिक करतात तेव्हा क्षणातच तुमच्या अकाऊंटमधील पैसे दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होतात. यामध्ये कोणताही कूलिंग पिरियड नसतो. तसेच ऑटोमॅटिक रिव्हर्सचा पर्याय देखील यामध्ये उपलब्ध नसतो. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या एका चुकीमुळे चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले, तर हे पैसे पुन्हा मिळणार कठीण होऊन बसतं. भारतीय कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले असतील तर त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय ट्रान्सफर झालेले पैसे परत मिळवू शकत नाही, तुम्ही चुकीने ट्रान्सफर केले असेल तरीही…. (फोटो सौजन्य – Pinterest)

जर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवायचे असतील तर त्या व्यक्तीची परवानगी असणे अत्यंत गरजेचे आहे. नियमानुसार, ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी संपूर्ण माहिती योग्य आहे की नाही हे तपासण्यात अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत बँक तुम्हाला पुन्हा संधी देत नाही की तुम्ही तुमचे ट्रान्सफर केलेले पैसे तुम्हाला मिळू शकते. पण काही नियम आणि कायदे पाळून तुम्ही तुमचे पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकता. चुकीचे यूपीआय ट्रान्सफर झाल्यास सर्वात आधी तुम्हाला तक्रार दाखल करावी लागणार आहे.

जवळजवळ प्रत्येक UPI अ‍ॅपमध्ये ट्रांजेक्शन हिस्ट्रीमध्ये डिसपूट किंवा चुकीचे ट्रांसफर पर्याय असतो. येथे तक्रार दाखल केल्याने त्वरित परतावा मिळणार नाही, परंतु त्यामुळे तुमचा खटला रेकॉर्डवर राहील. तुमची व्यवहार पावती, UTR क्रमांक, तारीख आणि रक्कम तयार ठेवा आणि तक्रार नोंदवा. सपोर्ट टीम NPCI द्वारे परतफेड विनंती करू शकते. तर दुसरा पर्याय म्हणजे विवाद निवारण यंत्रणा विभागांतर्गत NPCI वेबसाइटवर थेट तक्रार दाखल करणे. यासाठी व्यवहार आयडी, UTR क्रमांक, रक्कम आणि पाठवणाऱ्या आणि प्राप्तकर्त्याचे UPI आयडी या सर्वांची गरज असते. त्यानंतर NPCI तपास करते आणि केस वैध असल्यास बँकेला पैसे परत करण्याचे निर्देश देते.

या स्मार्टफोनवर फिदा झाले यूजर्स! विक्रीत ठरला नंबर 1, जाणून घ्या लोकप्रियतेचं रहस्य

तुम्ही तक्रार दाखल केल्यानंतर तुमची बँक पैसे प्राप्त करणाऱ्या युजरच्या बँकेसोबत संपर्क करेल आणि त्यांना घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती देईल. जर समोरचा व्यक्ती चुकीने ट्रान्सफर झालेले पैसे पुन्हा देण्यासाठी तयार असेल तर पुढील काही दिवसात तुम्ही ट्रान्सफर केलेली संपूर्ण रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल. पण जर पैसे प्राप्त करणारा यूजर तुमचे पैसे पुन्हा देण्यास नकार देत असेल तर यामध्ये बँक काहीच करू शकत नाही. अकाऊंट होल्डरच्या परवानगीशिवाय पैसे ट्रान्सफर करणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत पोलिसांत तक्रार दाखल करणे सोयीचे मानले जाते.

Web Title: Do not take tension if you transfer money in wrong account by mistake know the process of refund tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • online payment
  • TECH TIPS
  • UPI

संबंधित बातम्या

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
1

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स
2

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
3

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

GST Council Meeting: 7 ऑक्टोबरला होणार परिषदेची बैठक, UPI MDR Charges वर लहान उद्योगांना मिळणार सुटकेचा निःश्वास?
4

GST Council Meeting: 7 ऑक्टोबरला होणार परिषदेची बैठक, UPI MDR Charges वर लहान उद्योगांना मिळणार सुटकेचा निःश्वास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.