स्वस्तात मस्त! 8 हजाराहून कमी किमतीत लाँच झालाय हा अप्रतिम स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि भल्या मोठ्या बॅटरीने सुसज्ज
तुम्हीही कमी किमतीत एक दर्जेदार स्मार्टफोन घेण्याच्या विचारत असाल तर आजची ही बातमी तुम्चायसाठी फायद्याची ठरणार आहे. नुकताच Nubia V70 Design ZTE च्या सब्सिडियरी कंपनीने आपलो V-सीरीजचा नवीनतम हँडसेट लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 6.7-इंच एलसीडी स्क्रीनसह सुसज्ज आहे आणि त्यात Live Island 2.0 फिचर आहे जे ॲपलच्या (Apple) डायनॅमिक आयलंड फीचरप्रमाणे असेल. कंपनीच्या मते, Nubia V70 Design 4GB रॅम आणि 256GB स्टोरेजने सुसज्ज आहे. यात 5,000mAh बॅटरी देखील आहे, जी 22.5W चार्जिंग सपोर्टसह चार्ज केली जाऊ शकते. हे Android 14 वर चालते, ज्याच्या वर कंपनीची MyOS 14 स्किन आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, नुबिया ही एक चायनीज कंपनी आहे.
किंमत आणि उपलब्धता
याच्या किमतीबाबत बोलणे केले तर, Nubia V70 Design ची किंमत PHP 5,299 (अंदाजे रु 7,600) आहे आणि हा स्मार्टफोन फिलिपिन्समध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. हा नवीनतम स्मार्टफोन सायट्रस ऑरेंज, जेड ग्रीन, रोझ पिंक आणि स्टोन ग्रे या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा फोन 28 नोव्हेंबरपासून Lazada, Shopee आणि इतर रिटेल चॅनेलद्वारे देशात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल.
टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा
Nubia V70 Design चे स्पेसिफिकेशन्स
ड्युअल-सिम (Nano + Nano) Nubia V70 Design Android 14 वर आधारित MyOS 14 वर चालते. यात 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.7-इंचाची IPS LCD स्क्रीन आहे. हा फोन 12nm octa core Unisoc T606 प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो 4GB रॅमसह जोडलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या कॅमेऱ्याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. समोर 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी आहे.
ग्राहकांना Nubia V70 डिझाइनमध्ये 256GB स्टोरेज देखील मिळेल. कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, येथे ग्राहकांना 4G, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS आणि USB टाइप-सी पोर्टचा सपोर्ट मिळेल. या स्मार्टफोनची बॅटरी 5,000mAh आहे आणि ग्राहकांना 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल. नोटिफिकेशन्ससाठी यामध्ये Live Island 2.0 फीचर देखील देण्यात आले आहे.
टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा
Nubia Z70 Ultra
तुम्हाला आम्ही सांगतो की, मागेच चीनमध्ये Nubia Z70 Ultra लाँच करण्यात आले आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर, 80W वायर्ड चार्जिंगसह 6,150mAh बॅटरी आणि 6.85-इंच AMOLED डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. तसेच, फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा युनिट आहे ज्यामध्ये 64-मेगापिक्सलचा टेलीफोटो शूटर आहे.