व्हॉट्सॲप हे ऑनलाईन ॲप तुमच्या ओळखीचेच आहे. सध्या व्हॉट्सॲपवर करोडोंच्या घरात युजर्स आहेत. कंपनी आपल्या युजर्ससाठी नेहमीच काही ना काही नवीन फिचर्स आणत असते . त्यातच आता व्हॉट्सॲपने गुरुवारी आणखीन एक नवीन फीचर जारी केले आहे, ज्यामुळे व्हॉईस मेसेज शेअरिंग आणखीन सोयीस्कर होऊ शकते. कंपनीने व्हॉट्सॲपच्या Android आणि iOS प्लॅटफॉर्मसाठी नवीन व्हॉईस मसेज ट्रान्सक्रिप्ट फिचर सादर केले आहे. यासह, युजर्स इतरांकडून प्राप्त झालेल्या व्हॉइस संदेशांचे टेक्स्ट-आधारित ट्रान्सक्रिप्शन पाहू शकतील. युजर्स कुठेतरी प्रवास करत असतील किंवा गोंगाटाच्या ठिकाणी अडकले असतील तेव्हा हे फिचर त्यांच्यासाठी विशेषतः फार उपयुक्त ठरेल.
व्हॉट्सॲपचा व्हाइस मेसेज ट्रांसक्रिप्ट
ब्लॉग पोस्टमध्ये, व्हॉट्सॲपने हायलाइट केले की व्हॉइस मेसेज ट्रान्स्क्रिप्ट्स डिव्हाइसवरच जेनरेट केले जातात आणि कोणताही दुसरा व्यक्ती ट्रान्स्क्रिप्ट्स केलेला मेसेज कंटेंट ऐकू किंवा वाचू शकत नाही. कंपनीने जोर दिला की व्हॉईस मेसेज अजूनही इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे संरक्षित आहेत.
टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा
युजर्सना हे फीचर वापरण्यापूर्वी ते ऑन करावे लागेल. एकदा हे फिचर ऑन केल्यावर, निवडलेल्या भाषेतील व्हॉइस मेसेजच्या खाली एक ट्रांसक्रिप्ट स्वतःच दिसून येतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, व्हॉइस मेसेजचा ट्रान्सक्रिप्ट फक्त रिसीव्हरला दिसेल, तो पाठवणाऱ्याला दिसणार नाही. व्हॉट्सॲपचे म्हणणे आहे की सध्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर फक्त इंग्रजी, पोर्तुगीज, स्पॅनिश आणि रशियन भाषांसाठी सपोर्ट आहे. तर, त्याचे iOS ॲप अरबी, चायनीज, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी, नॉर्वेजियन, थाई, तुर्की आणि स्वीडिश यासह अनेक भाषांसाठी समर्थित आहे.
अशाप्रकारे करा फीचरचा वापर
टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा
व्हॉट्सॲपने म्हटले आहे की, ट्रान्सक्रिप्शन दिसण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. कंपनीने म्हटले आहे की जर युजर्सना Transcript unavailable एरर दिसले, तर याचा अर्थ ट्रांसक्रिप्ट लॅग्वेज अन्सपोर्टेड आहे, किंवा बॅग्राऊंडच्या आवाजामुळे शब्द ओळखले जात नाहीत किंवा व्हॉइस मेसेज लॅग्वेज सपोर्ट करत नाही. कंपनीने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे, कारण व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट चुकीचे असण्याची शक्यता आहे.