
फोटो सौजन्य - Social Media
तैवानस्थित आघाडीची तंत्रज्ञान कंपनी ASUS ने आपल्या 2026 कम्युनिटी इव्हेंट मालिकेची सुरुवात मुंबईत ‘बियॉन्ड इन्क्रेडिबल विथ एसुस’ या पहिल्या आवृत्तीसह केली. दादर येथील ‘सोशल्स’मध्ये आयोजित या कार्यक्रमात ९५ हून अधिक क्रिएटर्स, तंत्रज्ञानप्रेमी, विद्यार्थी आणि माध्यम प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सर्जनशीलता, नवकल्पना आणि पुढील पिढीतील संगणकीय अनुभवांवर आधारित या कार्यक्रमाने उपस्थितांना एक वेगळा तंत्रज्ञान अनुभव दिला.
या इव्हेंटमध्ये एसुसच्या नवीनतम क्रिएटर सिरीज डिव्हाइसेसचे प्रदर्शन करण्यात आले. विशेषतः झेनबुक एएमडी मालिकेचे प्रात्यक्षिक सादर करत कंपनीने उच्च कार्यक्षमता आणि बहुपयोगी संगणकीय उपायांची झलक दाखवली. क्रिएटर्स, व्यावसायिक आणि दैनंदिन वापरकर्त्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची कंपनीची बांधिलकी यावेळी अधोरेखित झाली. कार्यक्रमात संवादात्मक सत्राचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यात उत्पादन धोरण आणि भारतातील कम्युनिटी उपक्रमांवर चर्चा झाली.
या कार्यक्रमात एसुस इंडियाचे कन्झ्युमर आणि गेमिंग पीसी विभागाचे उपाध्यक्ष अर्नोल्ड सू यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन तंत्रज्ञान विकसित करण्यावर कंपनीचा भर असल्याचे सांगितले. कार्यक्षमता, पोर्टेबिलिटी आणि विश्वासार्हता या घटकांना प्राधान्य देत उत्पादने विकसित केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात प्रोआर्ट, प्रोआर्ट पी16 आणि आरओजी झेफायरस जी14 यांसारख्या उत्पादनांचे इंटरएक्टिव्ह प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. लाईव्ह डेमोन्स्ट्रेशनच्या माध्यमातून कंटेंट क्रिएशन आणि मल्टिटास्किंगसाठी या डिव्हाइसेसची कार्यक्षमता दाखवण्यात आली. एआय-सक्षम फीचर्स, अचूक डिझाइन आणि उच्च परफॉर्मन्सचा समन्वय कसा साधला जातो, याचा अनुभव उपस्थितांना घेता आला. यावेळी रविरंजन सिंग, राहूल हिंदूजा, रेबेक कौर, शौर्य, खुमेल ठाकूर आणि बुलबुल भान यांसारख्या लोकप्रिय क्रिएटर्सनीही सहभाग घेतला. त्यांनी प्रत्यक्ष अनुभव शेअर करत उपस्थितांशी संवाद साधला. यामुळे कार्यक्रमाचा कम्युनिटी-केंद्रित दृष्टिकोन अधिक बळकट झाला आणि सहभागींना प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली.
या संपूर्ण कार्यक्रमात लाईव्ह डेमो, संवादात्मक चर्चा, प्रत्यक्ष अनुभव आणि गिव्हअवे यांचा समावेश होता. त्यामुळे उपस्थितांचा सहभाग वाढला आणि एसुसच्या तंत्रज्ञानाचा अनुभव अधिक जवळून घेता आला. 2025 मध्ये बेंगळुरू, पुणे, हैदराबाद आणि कोलकाता येथे यशस्वी कम्युनिटी टूरनंतर आता 2026 मध्ये मुंबईपासून नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. पुढील कार्यक्रम चेन्नई येथे होणार असून, भारतभर तंत्रज्ञानविषयक संवाद अधिक मजबूत करण्याचा कंपनीचा मानस आहे. एसुस ही नाविन्यपूर्ण आणि वापरकर्ता-केंद्रित उपकरणे तयार करणारी जागतिक कंपनी असून, ५,००० हून अधिक संशोधकांच्या टीमसह ती आधुनिक तंत्रज्ञानाचा नवा आयाम घडवत आहे. गुणवत्ता, डिझाइन आणि नाविन्य यासाठी कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले असून, जागतिक स्तरावर तिची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.