Realme 14 Pro+ Lauched: जगातील पहिला असा स्मार्टफोन जो बदलतो आपला रंग! किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या
Realme 14 Pro+ स्मार्टफोन भारतात लाँच होण्यापूर्वी चीनमध्ये लाँच झाला आहे. कंपनी ही सिरीज 16 जानेवारीला भारतात आणत आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, यात रंग बदलणारे बॅक डिझाइन आहे. जेव्हा तापमान 16 अंशांपेक्षा कमी असते तेव्हा फोनचा रंग बदलू लागतो. रियलच्या नवीनतम फोनला धूळ आणि स्प्लॅश प्रूफ करण्यासाठी IP69, IP68 आणि IP66 रेटिंग मिळाली आहे. पॉवरसाठी, यात जलद चार्जिंग सपोर्टसह 6000 mAh बॅटरी आहे. नवीनतम स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी हा फोन एक उत्तम पर्याय आहे. फोनच्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
चायनामध्ये Realme 14 Pro+ या किमतीत झालाय लाँच
Realme 14 Pro+ स्मार्टफोन चीनमध्ये CNY 2,599 (अंदाजे 30,500 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला आहे. ही किंमत 12 GB रॅम आणि 256 GB व्हेरिएंटसाठी आहे. हा फोन 12 GB रॅम आणि 512 GB व्हेरिएंटमध्ये देखील येतो. हा फोन ग्लिडन व्हाइट आणि सी रॉक ग्रे रंगात येतो. त्याची विक्री चीनमध्ये थेट झाली आहे.
तुमच्या स्मार्टफोनमध्ये करा हा छोटासा जुगाड, 1.5GB डेटाही दिवसभर चालेल
डिस्प्ले
फोनमध्ये 6.83 इंच 1.5K वक्र AMOLED डिस्प्ले आहे, जो 2800 X 1272 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले 1.07 अब्ज रंग, 3840Hz PWM मंदीकरण आणि 1500 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
प्रोसेसर
यात Qualcomm चा Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर आहे. जे Adreno GPU सह जोडलेले आहे.
स्टोरेज
फोन 12GB + 256GB आणि 12GB + 512GB स्टोरेज वेरिएंटमध्ये देखील येतो.
OS
फोन Android 15 आधारित Realme UI 6.0 कस्टम स्किनवर चालतो.
कॅमेरा
Realme 14 Pro+ मध्ये 50MP Sony IMX896 प्राथमिक सेन्सर आहे. 50MP अल्ट्रावाइड अँगल लेन्स उपलब्ध आहे, जी 3x झूमला सपोर्ट करते. सेल्फीसाठी यात 32MP कॅमेरा आहे.
बॅटरी
यात 80W जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी 6,000mAh बॅटरी आहे.
अन्य फीचर्स
यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, IP69, IP68 आणि IP66 रेटिंग आहेत. हा फोन स्टीरिओ स्पीकरसह लॉन्च करण्यात आला आहे.
परवडणाऱ्या किमतीत ॲपल लाँच करणार सर्वात स्वस्त iPhone, कंपनीची जोरदार तयारी सुरू; किती असेल किंमत?
भारतात लवकरच लाँच होणार सिरीज
Realme 14 Pro सिरीज भारतात चार कलर व्हेरियंटमध्ये आणली जात आहे, जे पर्ल व्हाइट, सुएड ग्रे, बिकानेर पर्पल आणि जयपूर पिंक आहेत. बिकानेर पर्पल आणि जयपूर पिंक कलर फक्त भारतासाठीच एक्सक्लूजीव असतील. दरम्यान नवीन लाइनअप हे जगातील पहिले कोल्ड-सेंसिटिव कलर-चेंजिंग डिजाइन आणि ट्रिपल फ्लॅशलाइटसह आणले जात आहे.