ई कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या सेलमधून शॉपिंग करताय? थांबा, खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा काही महत्त्वाच्या Tech Tips
12 जुलै हा दिवस अत्यंत खास असणार आहे. कारण या दिवशी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक वस्तू कमी किंंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. स्मार्टफोन, ईअरबड्स, लॅपटॉप, कपडे, होम अप्लायसेंस, फॅशन, ब्युटी, यासांरख्या अनेक वस्तू अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. काही वस्तूंवर तर ग्राहकांना 60 ते 70 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे या सेलमधून खरेदी केल्यास ग्राहकांची मोठी बचत होणार आहे.
सेलमधून खरेदी करणं चांगलं वाटत असलं तरी देखील अशावेळी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. सेलमधील ऑफर्स आणि डिस्काऊंटवर विश्वास ठेवताना आपली कोणी फसवणूक तर करत नाही ना, याची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. याशिवाय आपल्याला सर्वात आधी डिल्सचा फायदा घेण्यासाठी काय करावं लागेल, याबाबत देखील माहिती असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही सेव्ह केलेले प्रोडक्ट्स आऊट ऑफ स्टॉक होतील तरी देखील तुम्हाला समजणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
सर्वात आधी तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, त्या विशलिस्ट किंवा कार्टमध्ये सेव्ह करा. ज्यामुळे सेल सुरु झाल्यानंतर तुम्ही लगेच वस्तूंची खरेदी करू शकाल आणि जास्त शोधाशोध करावी लागणार आहे. याशिवाय तुम्ही सेव्ह केलेल्या वस्तूंच्या किंमती कमी झाल्या की तुम्हाला लगेचच अलर्ट मिळणार आहे. लाइटनिंग डील्समध्ये प्रोडक्ट्स मर्यादित असतात आणि वेळ देखील कमी असतो. त्यामुळे अशा डिल्ससाठी रिमाईंडर सेट करा, ज्यामुळे तुम्ही लगेच खरेदी करू शकणार आहात. स्पेशली पॉप्युलर गैजेट्स, होम अप्लायंसेस आणि फैशन आइटम्ससाठी रिमाईंडर सेट करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या वस्तू मर्यादित असतात. एकाच प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्यापेक्षा दोन्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवा. याशिवाय, जुन्या किमतींबद्दल माहिती मिळविण्यासाठी तुम्ही किंमत-ट्रॅकिंग टूल्स वापरावेत.
शॉपिंगसाठी तयार आहात ना! या दिवशी सुरु होतोय Amazon प्राइम डे सेल, Top Deals चा झाला खुलासा
काही कंपन्या अशा आहेत ज्या विक्रीच्या अगदी आधी त्यांच्या प्रोडक्ट्सच्या किंमत MRP (मूळ किंमत) पर्यंत वाढवतात, जेणेकरून सेल सुरु झाल्यावर सवलत मोठी दिसेल. अशा परिस्थितीत, नेहमी गुगल शॉपिंग किंवा विश्वसनीय प्राइस कंपेयर वेबसाइटवर उत्पादनाचे बाजारभाव तपासा. सेलमध्ये कोणतेही गॅझेट किंवा एक्सेसरी खरेदी करताना त्याच्या वॉरंटीवर लक्ष ठेवा.
कधीकधी जर मोबाईल फोन, लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक उत्पादने चार्जर, कव्हर आणि हेडफोन्स सारख्या कोणत्याही अॅक्सेसरीजच्या वाढीव वॉरंटीसह खरेदी करणं फायद्याचं ठरतं. इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्वयंपाकघरातील उपकरणे यासारखी महागडी उत्पादने लवकर विकली जातात. म्हणून प्रथम ही खरेदी करा, त्यानंतर तुम्ही लाइफस्टाइल आणि फॅशनच्या वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ काढू शकता.