आला रे आला, Flipkart चा Goat Sale 2025 अखेर आलाच! खरेदीची तयारी करा सुरु, या प्रोडक्ट्सवर मिळणार तब्बल 80 टक्के डिस्काऊंट
स्मार्टफोन्स, हेडफोन्स किंवा इतर वस्तू खरेदी करायच्या आहेत? थांबा, शॉपिंगची घाई करू नका. कारण येत्या काही दिवसांतच ई कॉमर्स फ्लॅटफॉर्म फ्लिपकार्टचा Flipkart Goat Sale 2025 सुरु होणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला आकर्षक डिस्काऊंट, ऑफर्ससह कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या ऑफर्स आणि डिस्काऊंटसह तुम्ही वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर तब्बल 80 टक्क्यांपर्यंंत डिस्काऊंट मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला फोन्स आणि लॅपटॉपवर देखील जबरदस्त ऑफर्स मिळणार आहेत. Flipkart Goat Sale 2025 ची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने याबाबत एक्सवर पोस्ट शेअर माहिती दिली आहे.
Flipkart Goat Sale 2025 ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 12 जुलैपासून सुरु होणार आहे. या सेलची शेवटची तारीख 17 जुलै 2025 असणार आहे. Flipkart Plus आणि VIP मेंबर्ससाठी हा सेल 24 तास आधीच सुरु होणार आहे. तुम्हाला देखील या ऑफर्स आणि डिल्सचा सर्वात आधी फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही Plus किंवा VIP मेंबरशिप खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
Flipkart GOAT Sale is here! 🐐Make way for the Greatest. Of. All. Time.
Mark your calendars and refresh those Wishlist’s — the madness begins on 12th July! pic.twitter.com/74Lf7AspXH
— Flipkart (@Flipkart) July 4, 2025
सेलदरम्यान Axis Bank Flipkart डेबिट कार्डचा वापर करून 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. तर Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डचा वापर करून 7.5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक ऑफर केलं जाणार आहे. सेलदरम्यान Double Discounts, Steal Deals, Deal Of The Day, Tik Tok Deals, Rush Hours, आणि G.O.A.T Top 50 सारख्या डिल्स उपलब्ध असणार आहेत.
आगामी फ्लिपकार्ट सेलदरम्यान तुम्हाला CMF Phone 2 Pro स्मार्टफोन 17,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच Nothing Phone (3a) फोन तुम्ही केवळ 22,999 रुपयांत खरेदी करू शकणार आहात. याशिवाय आयफोनसह इतर स्मार्टफोनवर देखील जबरदस्त डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. ज्यामुळे तुम्ही iPhone 16 Plus, Motorola Edge 60 Fusion आणि Vivo T4x (8GB) सारखे स्मार्टफोन्स अतिशय कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहात.
सेलमधील लॅपटॉपची किंमत 2X, 990 रुपयांपासून सुरू होईल, तर गेमिंग लॅपटॉपची किंमत 4X,999 रुपयांपासून सुरू होईल. हेडफोन आणि इअरबड्सची किंमत X99 रुपयांपासून सुरू होईल. टॅब्लेटवरही मोठी सूट उपलब्ध असणार आहे. वॉटर प्युरिफायर्सवर 30 टक्के सूट दिली जाणार आहे, याशिवाय, स्वयंपाकघरातील डीलमधील उत्पादने 449 रुपयांपासून सुरू होतील. फॅशनमध्ये 60 टक्के ते 80 टक्क्यांपर्यंत आणि फुटवेअरमध्ये 50 टक्के ते80 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिलं जाणार आहे.