फोटो सौजन्य - pinterest
काहीवेळा आपल्याला कामासाठी अनेक दिवस घारापासून दूर जावं लागतं, अशावेळी घरात आई वडील एकटे असतात. त्यामुळे त्यांची चिंता सतत आपल्याला सतावत असते. तसेच घरात कोणी नसल्याचे पाहून चोरीच्या घटना घडण्याची देखील शक्यता असते. अशा परिस्थितीत सर्वात चांगला उपाय म्हणजे घरात CCTV कॅमेरा लावणं. हल्ली बाजारात प्रगत तंत्रज्ञानासह वेगवेगळ्या प्रकारचे CCTV कॅमेरे उपलब्ध आहेत.
CCTV कॅमेरे बाजारात आले तेव्हा ते खूप महाग होते. पण कालांतराने ते खूपच स्वस्त झाले आहेत. काळानुसार CCTV कॅमेऱ्यांच्या तंत्रज्ञानात आणि किमतीत मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरासाठी अगदी कमी किंमतीत पण चांगल्या तंत्रज्ञानाचा CCTV कॅमेरा खरेदी करू शकता. या CCTV कॅमेऱ्यांमध्ये तुम्हाला एचडी आणि वायफाय तंत्रज्ञानही मिळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ते स्वतः इन्स्टॉल करू शकता आणि तुमच्या फोनवरूनही त्यावर लक्ष ठेवू शकता.
हेदेखील वाचा- तुमच्या स्मार्टफोनला स्क्रीनगार्ड लावत आहात का? ‘या’ गोष्टींकडे नक्की लक्ष द्या
CP PLUS 2MP Full HD CCTV
हा कॅमेरा कोणत्याही ई-कॉमर्स साइटवर उपलब्ध आहे. Amazon वर CP PLUS 2MP Full HD CCTV ची किंमत 1599 रुपये आहे. इथे तुम्हाला डिस्काऊंट किंवा ऑफर्स देखील मिळतील. या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला FHD व्ह्यू, 360 डिग्री व्ह्यू आणि वायफायची सुविधा मिळते. त्यामुळे हा कॅमेरा तुमच्या घरासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
Tapo TP-Link C200
ई-कॉमर्स वेबसाईटवर Tapo TP-Link C200 कॅमेरा केवळ 1599 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला 1080 FHD आणि 360 डिग्री व्ह्यू मिळतो. यासोबतच यात वायफायसह टू वे ऑडिओचीही सुविधा आहे. तुम्ही घरात CCTV कॅमेरा बसवण्याचा विचार करत असाल तर Tapo TP-Link C200 चांगला पर्याय ठरेल.
हेदेखील वाचा- AI पार्टनरच्या प्रेमात पडला आहात का? आत्ताच सावध व्हा; MIT च्या संशोधकानी केला मोठा खुलासा
IMOU 360° 1080P Full HD
सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या CCTV कॅमेऱ्यांपैकी IMOU 360° 1080P Full HD हा एक आहे. यामध्ये मोशन ट्रॅकिंग, टू वे ऑडिओ, नाईट व्हिजन आणि वायफायचीही सुविधा आहे. तुम्ही IMOU 360° 1080P Full HD कॅमेरा ई-कॉमर्स वेबसाईटवरून केवळ 1299 रुपयांना खरेदी करू शकता.
CCTV कॅमेरा तर खरेदी केला तर पण तो घरात लावताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. कॅमेरा रेंज, कॅमेरा इंस्टॉलेशन, क्लालिटी, अॅप सपोर्ट कॅमेरा, नाइट व्हिजन सपोर्ट या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. अन्यथा तुम्ही घरात CCTV कॅमेरा लावून काहीही फायदा होणार नाही.
घरात CCTV कॅमेरे लावताना त्या कॅमेऱ्याची रेंज तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. घरात लावण्यात येणाऱ्या CCTV कॅमेऱ्याची रेंज किमान 20-25 मीटर असणं आवश्यक असतं. CCTV कॅमेऱ्याची रेंज जितकी चांगली असेल तुम्ही तितक्या दुरवरच्या वस्तू टीपू शकता. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगळा कॅमेरा लावण्याची गरज पडणार नाही. तुम्ही जर तुमच्या घरासाठी CCTV कॅमेरा घेण्याचा विचार करत असाल, तर त्या कॅमेऱ्याचं इंस्टॉलेशन कसं करायचं, हे ठरवावं लागेल. सध्या बाजारत असे अनेक कॅमेरे उपलब्ध आहेत जे इंस्टॉल करण्यास खूपच सोपे व प्लग-इन अॅडाप्टरसह येतात.