फोटो सौजन्य -iStock
सध्या स्मार्टफोन प्रत्येकाची गरज बनली आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांकडे स्मार्टफोन असतो. आपली अनके कामं स्मार्टफोनमुळे अगदी सहज केली जातात. पेमेंट, रिचार्ज, ऑनलाईन शॉपिंग, चॅटींग, व्हिडीओ कॉलींग अशा अनेक गोष्टी स्मार्टफोनमुळे अगदी सहज शक्य होतात. स्मार्टफोनशिवाय कोणत्याही कामाची कल्पनाही करता येत नाही. सर्व गोष्टींसाठी स्मार्टफोन उपयुक्त आहे. हल्ली वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या मॉडेल्सचे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये अनेक फीचर्स आपल्याला मिळतात.
जेवढे फीचर्स आणि स्मार्टफोनचा ब्रँड मोठा असले, तेवढी त्याची किंमत जास्त असते. त्यामुळे आपण सतत स्मार्टफोन खरेदी करत नाही. सहसा एकदा स्मार्टफोन खरेदी केला की त्यानंतर तो 3 ते 4 वर्षांसाठी वापरला जातो. त्यामुळे अशा परिस्थिती फोनचा जास्त काळ वापर करता यावा यासाठी फोनची सुरक्षा खूप महत्त्वाची असते. डिस्प्ले हा फोनमधील सर्वात नाजूक भाग आहे. जर फोनचा डिस्प्ले तुटला किंवा खराब झाला तर तो दुरुस्त करण्यासाठी आपल्याला खूप पैसे मोजावे लागतात. त्यामुळे फोनच्या डिस्प्लेची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. फोन डिस्प्ले संरक्षित ठेवण्यासाठी आपण स्क्रीन गार्ड लावतो. पण योग्य फोनच्या सुरक्षिततेसाठी योग्य स्क्रीन गार्ड लावणं गरजेचं असतं. आज आम्ही तुम्हाला स्क्रीनगार्ड बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगँणार आहोत. तुम्ही जेव्हाही तुमच्या फोनचा स्क्रीन गार्ड लावण्यासाठी जाणार, तेव्हा या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.
तुम्ही तुमच्या फोनसाठी स्क्रीन गार्ड निवडत असाल तर अँटी स्क्रॅच कडे विशेष लक्ष द्या. तुम्ही तुमच्या फोनसाठी स्क्रीन गार्ड निवडत असाल फोनला कात्री, चावी, ब्लेड किंवा अशा कोणत्याही वस्तूने नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागेल.अनेक वेळा फोन खिशात ठेवला जातो, अशा स्थितीत फोनजवळ चावी ठेवल्याने फोनची स्क्रीन खराब होऊ शकते. त्यामुळे
तुमच्या स्मार्टफोनसाठी अँटी स्क्रॅच स्क्रीन गार्डची निवड करणं योग्य राहिल.
चांगला स्क्रीनगार्ड निवडताना, त्याच्यावर स्मूथ टचची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक वेळी तुम्ही फोनच्या स्क्रीनला हात लावता तेव्हा स्क्रीनवर स्मूथ टच येणं महत्त्वाचं आहे. फोनचा स्क्रीन गार्ड असा असावा की त्याला स्पर्श केल्यावर तो मूळ स्क्रीनसारखा वाटेल. खराब दर्जाचे स्क्रॅच गार्ड खडबडीत काचेच्या फर्म्समधून बनवले जातात. ज्याला स्मूथ टच देता येत नाही.
स्क्रीनगार्ड फोनच्या स्क्रीनच्या अगदी वर ठेवला जातो. अशा स्थितीत फोन योग्य प्रकारे वापरता यावा यासाठी स्क्रीन गार्ड योग्य आकाराचा असणे गरजेचे आहे. स्क्रीनगार्डने फोन स्क्रीनचे संपूर्ण संरक्षण झालं पाहिजे. तसेच, स्क्रीन गार्ड फोनवर अशा प्रकारे बसवावा की हवेचा बबल दिसणार नाही.
अनेक वेळा हात न धुता फोन वापरावा लागतो. पाणी, तेल आणि धूळ असलेले हातही फोनला स्पर्श करतात. अशा स्थितीत फोनचा स्क्रीन गार्ड असा निवडावा जो अँटी फिंगरप्रिंट असेल. जर फोनवर फिंगरप्रिंट्स तयार होतात, तर फोनच्या डिस्प्लेमध्ये समस्या आहे.
अनेकवेळा फोन हातातून जमिनीवर पडल्यास नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, असं स्क्रीनगार्ड वापरणं फार महत्वाचे आहे जे शटर-प्रूफ आहे. फोनचा स्क्रीन गार्ड शटर-प्रूफ असल्यास तुमच्या फोनचा मूळ डिस्प्ले तुटण्यापासून सुरक्षित राहील.