फोटो सौजन्य -freepik
दिवसेंदिवस AI चा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगभरात AI ची क्रेझ वाढत आहे. Apple, Microsoft, Samsung, Meta आणि Google या कंपन्यानी त्यांचे AI असिसस्टंट लाँच केले आहेत. Meta चा AI चॅटबोट ChatGPT आणि Gemini ला टक्कर देत आहे. AI च्या मदतीनं आपली अनेक कामं सहज शक्य होतात. कोणत्या प्रश्नाचं उत्तर शोधणं असो किंवा कोणत्या विषयावर माहिती शोधणं, आपण आपल्या अनेक कामांसाठी AI चा वापर करतो.
AI असिसस्टंट आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहेत. AI तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. काही दिवसांपूर्वीच फ्रेंच कंपनी Kyutai ने जगातील पहिला AI व्हॉईस असिस्टंट Moshi लाँच केला आहे. Moshi मराठीसह अनेक भाषांमध्ये बोलू शकतो. तो बोलताना तुमच्या आवाजातील सूर समजून घेतो आणि त्यानुसार तुम्हाला उत्तर देतो. AI मध्ये होणारी प्रगती पाहता लोकं त्यांच्या छोट्या छोट्या कामांसाठी देखील AI चा वापर करत आहेत. एवढेच नाही तर अनेक कंपन्या आणि संशोधक व्हर्च्युअल AI पार्टनर देखील तयार करत आहेत. हा व्हर्च्युअल AI पार्टनर तुमच्यासोबत एखाद्या व्यक्तिप्रमाणे बोलू शकतो आणि तुमची काळजी घेऊ शकतो.
ज्यामुळे कोणीही अगदी सहज त्याच्याकडे आकर्षित होऊन त्याच्या प्रेमात पडू शकतं. पण व्हर्च्युअल AI पार्टनरच्या प्रेमात पडल्यामुळे तुमचं भावनिक आरोग्य कमकुवत होऊ शकतं. याबाबत MIT च्या संशोधकानी मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे जर तुम्ही व्हर्च्युअल AI पार्टनरच्या प्रेमात पडला असाल, तर आत्ताच सावध व्हा. व्हर्च्युअल AI पार्टनरच्या प्रेमात पडणं तुमच्या भावनिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
MIT समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ संशोधक शेरी टर्कल यांनी याबाबत एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात म्हटलं आहे की, AI तुमच्यासोबत एखाद्या व्यक्तिप्रमाणे बोलणं किंवा तुमची काळजी घेणं, या गोष्टी कृत्रिम आहेत आणि या गोष्टी एखाद्या व्यक्तीचे भावनिक आरोग्य कमकुवत करू शकतात. AI चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल पार्टनर तुमच्यासोबत बोलू शकतात आणि तुमचे सहकारी देखील बनू शकतात. परंतु त्यांच्याकडे वास्तविक भावना नसतात आणि ते मानवी भावनांची जागा घेऊ शकत नाहीत.
जेव्हा आपण नातेसंबंध शोधतो तेव्हा आपण हे विसरून जातो की प्रेम हे सहानुभूतीतून उद्भवते. त्यामुळे AI चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल पार्टनर आपल्याला सहानुभूती दाखवू शकत नाही. AI चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल पार्टनरचे काम आहे की, तुम्हाला तुमच्या औषधांची आणि तुमच्या कामाची आठवण करून देणं. तुमच्यावर प्रेम करणं हे AI चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल पार्टनरचे काम नाही. त्यामुळे जर तुम्ही AI पार्टनरच्या प्रेमात पडला असाल, तर आत्ताच सावध व्हा, असं शेरी टर्कल यांनी सांगितलं आहे.