नवीन स्कॅम! यूट्यूब व्हिडिओला लाईक करून व्यक्तीने गमावले तब्बल 56 लाख रुपये, तुम्ही ही चूक करू नका
आजच्या डिजिटल युगात स्कॅम आणि फ्रॉड्सचे प्रमाण फार वाढले आहेत. स्कॅमर्स निरनिराळ्या प्रकारांनी लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत असतात आणि बऱ्याचदा ते यात यशस्वी देखील होतात. वाढते स्कॅम्सचे प्रकार बघता लोकांना सतर्कता बाळगणे फार महत्त्वाचे आहे नाहीतर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. दरम्यान आता मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला आहे.
घरबसल्या आमच्या यूट्यूब व्हिडीओला लाईक करा आणि पैसे कमवा असा व्हॉट्सॲपवर तुम्हाला मेसेज आलाय का? अशा मेसेजपासून सावधान राहा आणि त्वरित असे काही नंबर्स ब्लॉक करा नाहीतर तुमचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. हा मेसेज म्हणजे ऑनलाईन फ्रॉडचा एक नवीन प्रकार आहे. घरबसल्या लाखो रुपये कमवण्याची संधी असल्याचा भास दाखवून तुमची फसवणूक केली जाते.
हेदेखील वाचा – भारताने चीनला टाकले मागे! ॲपलने iPhone मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बनवला नवा विक्रम
व्हॉट्सॲप आणि यूट्यूब सारख्या प्रसिद्ध प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात फसवणुकीची प्रकरणे समोर येत आहेत. यूट्यूब व्हिडीओ लाइक करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ लाईक करण्याच्या बदल्यात अर्धवेळ नोकरीची आश्वासने दिली जात आहेत आणि हॅकर्स त्यांचा हेतू पूर्ण करतात. वृत्तानुसार, हॅकर्सनी सहज पैसे कमावण्याच्या आशेने एका दुकानदाराची 56 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली.
वास्तविक, सुरुवातीला दुकानदाराला यूट्यूबवर काही कामासाठी 123 रुपये आणि 492 रुपये मोजावे लागले. यानंतर परत आल्याने खूश झालेल्या दुकानदाराला फ्रॉडमध्ये फसवण्यात आले. त्याला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडण्यात आले, जिथे त्याला कमिशनचे आमिष दाखवून पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. ही फसवणूक दुकानदाराला समजू शकली नाही आणि पीडितेने 56.7 लाख रुपये गुंतवले. मात्र त्यानंतर घोटाळे करणाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क करणे बंद केले आणि ही फसवणूक उघडकीस आली.
हेदेखील वाचा – Jio Finance’ची SmartGold योजना सुरू, फक्त 10 रुपयांत खरेदी करू शकता डिजिटल सोनं
फ्रॉडपासून वाचण्यासाठी या टिप्स फॉलो करा